supriya sule saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule News: संपूर्ण भारतात सिलेंडरचा दर 400 रुपये करा; सुप्रिया सुळेंची मोदी सरकारकडे मोठी मागणी

Supriya Sule News: इथं आयटी इनकम टॅक्स, ईडी आणि तिकडं सरकार आहे, म्हणून 400 रुपये सिलेंडर ? मग संपूर्ण देशात करा ना..., अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला केली मागणी

Vishal Gangurde

मंगेश कचरे, बारामती

Supriya Sule Latest Speech News:

'राज्यात महागाई कुठे कमी झाली? राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. तिथे भ्रष्ट जुमला पार्टी काय म्हणते की, 400 रुपयांना सिलेंडर देऊ,मग आमचं काय चुकलं? आम्ही महाराष्ट्रात आहोत. कारण इकडे निवडणूक नाही? आमच्या इथं आयटी इनकम टॅक्स, ईडी आणि तिकडं सरकार आहे, म्हणून 400 रुपये सिलेंडर ? मग संपूर्ण देशात करा ना... काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत करा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

खासदार सुप्रिया सुळे या पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी आशा सेविकांच्या आनंद मेळाव्याला भेट दिली. या मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ' उद्धव ठाकरे संवेदनशील नेते आहेत. राज्यात सध्या दुष्काळ आणि अवकाळी पावसाचं मोठं आव्हान आहे. शरद पवार साहेब केंद्रात मंत्री होते, त्यावेळी केंद्राची टीम येऊन काम करायची. ज्या ठिकाणी दुष्काळ आणि ओला दुष्काळ असलेल्या ठिकाणी काम करायची'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मनमोहन सिंग आणि शरद पवारांनी त्या काळात देशातील शेतकऱ्यांसाठी जे योगदान दिलं, ते कोणीही विसरणार नाही. आज काय परिस्थिती आहे? महाराष्ट्र सरकारने केंद्राने २६०० कोटींची मागणी केलेली आहे. मात्र, त्याने आपला प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.

'अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करून चालणार नाही? पंचनामे तर झालेच पाहीजे. राज्यात महागाई आणि बेरोजगारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ सरसकट कर्ज माफी करावी.अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यभरात मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलं जातं आहे. या ओबीसी मेळाव्यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, 'ही लोकशाही आहे. त्यामुळे ज्यांना त्यांना बोलायचा आणि सभा घ्यायचा अधिकार आहे. मी लोकशाहीच्या मार्गाने चालणारी आहे. सत्तेतमध्ये असणाऱ्या लोकांनी रस्त्यावर सभा घेऊन जर हे प्रश्न सुटणार आहेत का? सभागृहात हे प्रश्न मांडले गेले पाहिजे. मात्र, तसं होताना दिसत नाही. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचंही सुळे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rutuja Bagwe Photos: काळ्या रंगाच्या साडीत ऋतुजाचं सालस सौंदर्य, फोटो पाहून हृदय धडधडेल

Gold Rate: चांदीनंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण; एक लाखावर येणार सोनं? काय आहे कारण जाणून घ्या

Sitaphal Kheer Recipe : अवघ्या १० मिनिटांत स्वीट डिश तयार, झटपट बनवा सर्वांना आवडेल अशी सीताफळाची खीर

Maharashtra Live News Update: धुळ्यात जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात

Navi Mumbai Famous Place: लोणावळा, खंडाळा फिरून कंटाळा आला? नवी मुंबईतील ही ५ ठिकाणे नक्की फिरा

SCROLL FOR NEXT