Ban On Onion Export Saam TV
महाराष्ट्र

Ban On Onion Export: अजित पवारांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत ताेडगा निघणार?

व्यापाऱ्यांमध्येच फूट पडल्याने नाशिक जिल्ह्यातील विंचूर पाठोपाठ पिंपळगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाले आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

कांद्याच्या प्रश्नावर (onion issue) तोडगा काढण्यासाठी सोमवारी दिल्लीत बैठक बाेलाविण्यात आली आहे. ही बैठक केंद्रीय मंत्री पियूष गोयल (piyush goyal) यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार आहे. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पिंपळगाव बाजार समितीचे (pimpalgaon bazar samiti) सभापती आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

केंद्र सरकारने कांद्यावर 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी लावल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंदची हाक दिली होती. मात्र व्यापाऱ्यांमध्येच फूट पडल्याने नाशिक जिल्ह्यातील विंचूर पाठोपाठ पिंपळगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाले आहेत.

दरम्यान सोमवारी दिल्लीतही महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती पिंपळगाव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे. या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा आमदार दिलीप बनकर यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT