sugar cane  saam tv
महाराष्ट्र

Ethanol Production: इथेनाॅल निर्मितीवर केंद्राची बंदी, राज्याला बसणार साडेसहा हजार कोटींचा फटका?

Ethanol News: इथेनाॅल निर्मितीवर केंद्राची बंदी, राज्याला बसणार साडेसहा हजार कोटींचा फटका?

साम टिव्ही ब्युरो

Ethanol Production Ban:

केंद्र सरकारने साखर उद्योगासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 150 इथेनॉल प्रकल्पांना याचा थेट फटका बसणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारेसहा हजार पाचशे कोटींचा फटका बसण्याची भीती पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील साखर उद्योग आर्थिक अडचण देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील 188 साखर कारखान्यांपैकी सुमारे 150 साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकल्पामधून यावर्षी तयार होणाऱ्या सुमारे आठशे कोटी लिटर इथेनॉलचे विविध पेट्रोलियम कंपन्यांची करार देखील झाले आहेत. सध्या या सर्वच साखर कारखान्यांमधून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती सुरू असतानाच केंद्र सरकारने निर्मितीवर बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

या वर्षी सुरू आलेल्या साखर हंगामात सुमारे ८० लाख टन साखर निर्मिती होईल. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

इथेनॉल निर्मिती प्लांटमुळेज साखर कारखाने शेतकऱ्यांना अधिकचे दर देऊ शकले. पण आता केंद्र सरकारने नवा निर्णय घेतल्याने साखर कारखानदारी अडचणीत येण्याची भीती असून साडेसहा हजार कोटी रुपयांचा फटका या उद्योगाला बसणार आहे. राज्यातील जे साखर कारखाने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करतात ज्यांचे लाँग टर्म नियोजन नाही अशा कारखान्याच्या ऊस दरावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णय विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत आशिष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT