अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मंजुरी; पहिली बॅच यावर्षी सुरू होणार  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Alibag शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मंजुरी; पहिली बॅच यावर्षी सुरू होणार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रायगडचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. अलिबाग, उसर येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राने मंजुरी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रायगडचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. अलिबाग उसर येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राने मंजुरी दिली आहे. मंजुरीचे पत्र हे 16 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालयाची 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच यावर्षी सुरू होणार आहे. रायगडसह कोकणातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. आरसीएफ कॉलनी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री त्यांनी हि माहिती दिली.

हे देखील पहा :

रायगड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा असली तरी अतिगंभीर आजारावर उपचार करणारी यंत्रणा सक्षम नसल्याने अनेकवेळा रुग्णांना मुंबई, पुणे या शहराची उपचारासाठी वाट धरावी लागत होती. यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे अशी मनोकामना रायगडकरांची होती. केंद्राची मंजुरी महाविद्यालयाला मिळाल्याने रायगडकरांची आरोग्यसाठी होणारी हेळसांड आता थांबणार आहे. तत्कालीन अर्थमंत्री आताचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रयत्न केले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालय रखडले होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अदिती तटकरे ह्या रायगडच्या पालकमंत्री झाल्या आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हालचाली सुरू झाल्या.

अलिबाग तालुक्यातील उसर येथे 52 एकर जागा शासकीय महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली. राज्य शासनाने महाविद्यालयासाठी 406 कोटी निधीही अर्थसंकल्पात मंजूर केला. तत्पूर्वी महाविद्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने आरसीएफ कॉलनी येथे शाळा आणि इमारती तीन वर्षांच्या करारावर घेण्यात आल्या. यामध्ये लेक्चर रूम, विदयार्थी आणि अधिकारी यांना राहण्याची सुविधा करण्यात आली आहे.  त्यानंतर केंद्राच्या आलेल्या पथकाने महाविद्यालयाची पाहणी केली होती. शासकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यावर्षी सुरू करण्याचा मानस हा प्रशासन आणि पालकमंत्री याचा होता. मात्र, अद्यापही केंद्राची मंजुरी आलेली नव्हती. अखेर केंद्रीय पथक येऊन गेल्यानंतर दीड महिन्यांनी केंद्राने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्य मंजुरीचे पत्र पाठविले. त्यामुळे यावर्षी शासकीय महाविद्यालयाची पहिली 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू होणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ठाकरे सेनेकडून काटेचे फोटो पोस्ट

Eknath Shinde News : मला कारवाईचा बडगा उगारायला आवडणार नाही, पण...; एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कडक इशारा

Sanjay Shirsat: महायुतीचे नेते दमानियांच्या रडारवर,शिरसाटांच्या खात्यात 2000 कोटींचा घोटाळा? दमानियांच्या आरोपांनी खळबळ

Ind Vs Eng 3rd Test : रवींद्र जडेजाची झुंज व्यर्थ, लॉर्ड्स कसोटी भारताने गमावली; इंग्लंडचा विजय

Samosa: वेळीच व्हा सावधान! समोसा, जिलेबी धोकादायक, सिगारेटप्रमाणे हानिकारक

SCROLL FOR NEXT