Breaking News : पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा मावळली; GST कक्षेत समावेश नाही!

आज लखनऊ मध्ये जीएसटी परिषदेच्या ४५ व्या बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी संदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
Breaking News : पेट्रोल डिझेल GST च्या कक्षेत नाही!
Breaking News : पेट्रोल डिझेल GST च्या कक्षेत नाही!SaamTvNews

आज लखनऊ मध्ये जीएसटी परिषदेच्या 45 व्या बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी संदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. इथून पुढे लहान मुलांसाठी जीवनावश्यक अथवा जीवनरक्षक असणाऱ्या औषधांवरती जीएसटी लागणार नाही.

हे देखील पहा :

Keytruda सारख्या कर्करोगावर (cancer) उपचारासाठी लागणाऱ्या औषधांसाठी जीएसटी रेट 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेले आहेत. मालगाडी परमिट फी/ नॅशनल परमिट फी वरती आता जीएसटी लागणार नाही. दिव्यांग वापरात असलेल्या वाहनांवरील जीएसटी कमी करून 5 टक्के करण्यात आला आहे.

कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सवलत 31 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. अपंग लोकांनी वापरायच्या रिट्रोफिटमेंट किटवर जीएसटी दर 5% वर आणला आहे. OEM ला पुरवल्या जाणाऱ्या बायोडिझेलवरील जीएसटी कमी होऊन 5% झाला आहे. 75 टक्के  सरकारी  ट्रेनिंग कार्यक्रमांवर जीएसटी लागणार नाही.

यावेळी पुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या, पेट्रोल डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्यासंदर्भात GST परिषदेत चर्चा झाली. मात्र, परिषदेचे सदस्य पेट्रोलियम पदार्थ जीएसटी कक्षेत आणण्याबाबत सहमत नव्हते. तसेच जीएसटी परिषदेच्या सदस्यांनी यावर सहमती दर्शविली की यावर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. केरळ उच्च न्यायालयाने पेट्रोल डिझेल  जीएसटी कक्षेमध्ये आणण्याबाबत विचार करावा, अशी सूचना दिली होती. त्यानुसार चर्चा झाली चर्चेची माहिती केरळ उच्च न्यायालयाला देऊ, असेही त्या म्हणाल्या.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या चर्चेला पूर्ण विराम देताना पेट्रोल डिझेल GST च्या कक्षेत येणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com