ED News Saam Tv
महाराष्ट्र

Sachin Sawant Arrested: मोठी बातमी! वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना अटक

मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती.

Shivani Tichkule

सचिन गाड

Breaking News: सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडी छापा टाकला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी हा छापा टाकण्यात आला. यावेळी सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. त्यानंतर सावंत यांना अटक करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

सावंत याआधी ईडी मुंबई (Mumbai) झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाची चौकशी केली होती. सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला.

काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सचिन सावंत यांच्याविरोधात फिर्याद दिली होती.

या तक्रारीमुळे सीबीआय (CBI) सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान मंगळवारी ईडीने (ED) सचिन सावंत यांच्या निवासस्थानासह मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकून चौकशी केली. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे. या प्रकरणी मध्यरात्रीपर्यंत शोधमोहीम सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

Dhangar Agitation : धनगर समाजाचे महाराष्ट्रात चक्काजाम, एकाही गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, आरक्षणावरून थेट इशारा

Driverless Auto:भारतात जगातील पहिली ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक ऑटो लाँच, कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Fire In Nalasopara: नालासोपारा पूर्वेत कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; दोन दुकानं पूर्णतः खाक|VIDEO

SCROLL FOR NEXT