Census 2026  google
महाराष्ट्र

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

Maharashtra Census 2027: सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातीले मूठ गावाने राज्यातील स्व-गणना मोहिमेत इतिहास रचला आहे. गावातील सर्व कुटुंबांनी डिजिटल पद्धतीने माहिती भरून कोकणातले पहिले पूर्ण स्वगणना गाव ठरले.

Sakshi Sunil Jadhav

१ मे पासून संपूर्ण राज्यात जनगणलेला सुरुवात झाली. ही गणना पहिल्यांदाच वेगळ्या म्हणजेच डिजिटल पद्धतीने होणार आहे. यालाच स्व गणना असं म्हंटलं जात आहे. ही स्व गणना तुम्हाला फक्त १५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. याच मोहिमेत अनेक नागरिकांनी स्व गणनेला सुरुवात केली आहे. महत्वाची बातमी म्हणजे यामध्ये पहिला क्रमांक हा सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावाने पटकावला आहे.

मूठ गावातल्या सर्व नागरिकांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे डांगे यांनी या कामगिरीबद्दल गावकऱ्यांचे आणि प्रशासनाचे कौतुक सुद्धा केले. तसेच राज्यातल्या इतर गावांनीही मूठ गावाचा आदर्श घेत स्वगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन केले.

मूठ गावाचा एकू ३६ घरं आणि ४३ कुटुंब आहेत. गावाची लोकसंख्या १४४ इतकी आहे. गावातल्या प्रत्येक कुटुंबाने यामध्ये सहभाग घेत अचूक माहिती सादर केली आहे. त्याचमुळे ही मोहीम यशस्वी रित्या पार पडली.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवण्यात आली. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सूक्ष्म नियोजन करत मोहिमेची अंमलबजावणी केली होती. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनीही विशेष मेहनत घेतली आहे.

जनगणेनेच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार १६ मे ते १४ जून या काळात जनगणना करणारे अधिकारी राज्यातल्या प्रत्येक घराला भेट देतील. तसेच तुम्ही se.census.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमची माहिती त्यामध्ये देऊ शकता. जनगणना ही २०२७ साठी राज्यातल्या सर्व जिल्हे, तालुके, शहरं, गावं यांच्या प्रशासकीय सीमा १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी प्रशासकीय सीमा गोठवण्यात आल्या. म्हणजेच आता यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT