Celebration Of Rajmata Jijau Jayanti  saam tv
महाराष्ट्र

Rajmata Jijau Jayanti 2024 : छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 हजार पणत्यांनी साकारली राजमाता जिजाऊंची प्रतिमा,जन्मस्थळीही भक्तांची अलाेट गर्दी

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

- संजय जाधव, रामू ढाकणे, मनोज जयस्वाल

Rajmata Jijau Jayanti News :

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय अशा जयघाेषात आणि विविध उपक्रमांनी आज (शुक्रवार) राज्यातील विविध जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ यांचा आज 426 वा जन्मोत्सव जिजाऊंच्या जन्म गावी सिंदखेडराजा (Sindkhed Raja) येथे माेठ्या उत्साहात साजरा होत आहे. (Maharashtra News)

सिंदखेडराजा येथे सकाळी शासकीय महापूजेने राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊंच्या वंशजांनी जिजाऊंचे पूजन केले. जिजाऊंना वंदन करण्यासाठी सकाळपासूनच लाखो जिजाऊ भक्तांची गर्दी झाली आहे.

वाशिमला केळीच्या पानावर विद्यार्थ्याने साकारलं जिजाऊचं चित्र

वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाच्या अभिषेक आत्माराम जाधव या विद्यार्थ्यानं आज राजमाता जिजाऊ जयंती निमित्त केळीच्या पानावर जिजाऊचं चित्र कोरलं आहे. त्याच्या या कलेचं सर्वत्र काैतुक होत आहे. अभिषेकनं यापूर्वी पिंपळाच्या पानावर अनेक महापुरुषांची चित्र रेखाटली आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकी रॅली

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शहरातील क्रांती चौक ते चिकलठाणा पर्यंत दुचाकीची रॅली काढण्यात आली. शहरातील क्रांती चौकात राष्ट्रमाता जिजाऊ यांची रांगोळी काढत प्रतिमा साकारण्यात आली आहे. दरम्यान प्रतिमा रथात ठेवून लहान लहान चिमुकल्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारत या अभिवादन रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी महिलांनी भगवे फेटे परिधान केले हाेते. तत्पूर्वी काही शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर करून व्यसनमुक्ती संदर्भात संदेश दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पणत्यांच्या माध्यमातून साकारली जिजाऊंची प्रतिमा

छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती महाविद्यालयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्त 45 ते 50 हजार वेगवेगळ्या रंगाच्या पणत्यांनी जिजाऊंची प्रतिमा साकारली. ही प्रतिमा बनवण्यासाठी तब्बल 3 दिवसांचा अवधी लागला. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बनवण्यासाठी मदत केली. ही पणत्यांची आकर्षक प्रतिमा शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

SCROLL FOR NEXT