Class 11 and 12 students in Maharashtra will now have mandatory biometric attendance saam tv
महाराष्ट्र

बायोमेट्रिक हजेरी, वर्गांमधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग; अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

Education Department New Rule : महाराष्ट्र शिक्षण प्रशासनाने इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही पाळत प्रणाली सुरू केली आहे.

Bharat Jadhav

अकरावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होतील. तर त्याआधी १५ जूनपासून बारावीच्या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी नवे नियम लागू केले आहेत.

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावे लागेल आणि त्यांची उपस्थिती आवश्यक असणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचेही बंधन असणार आहे. वर्गात विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे.

इयत्ता अकरावी-बारावीच्या वर्गात प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी शाळेत कमी हजेरी लावता. शाळेपेक्षा ते खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नियमित हजेरी लावत असतात. काही काही शाळांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत करार केल्याच्याही तक्रारी आहेत. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेतला जाणार आहे. यासह प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. इयत्ता अकरावी-बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आवश्यक असणार आहे.

त्या शाळांनी त्यांचा यू-डायस क्रमांक व शाळेचे मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे. कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरातील कोणत्या खासगी कोचिंग क्लासेससोबत टायअप तथा करार केला आहे का, याचीही गोपनीय पडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला बायोमेट्रिक मशीनवर दररोज हजेरी नोंदवावी लागेल.

वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवत असताना तेथील मुख्याध्यापक प्रत्येक वर्गातील उपस्थिती सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहतील. या नियमांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, तो शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांना पाठविला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सोलापूर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या फीवाढी बाबतही मोठा निर्णय घेतला आहे. काही शाळा मोजक्याच पालकांसमवेत बैठक घेऊन शुल्कवाढ करतात. त्यानंतर उर्वरित पालक त्याविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. तर दुसरीकडे काही खासगी अनुदानित शाळादेखील प्रवेशावेळी शुल्क घेतात. या पार्श्वभूमीवर आता त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक घेऊनच शुल्कवाढीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT