CBSE: दहावी- बारावीची फेरपरीक्षा आजपासून; ऑफलाइन पद्धतीने होणार परीक्षा Saam Tv
महाराष्ट्र

CBSE: दहावी- बारावीची फेरपरीक्षा आजपासून; ऑफलाइन पद्धतीने होणार परीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सीबीएसईच्या घेण्यात येणाऱ्या दहावी- बारावीची फेरपरीक्षा आज 25 ऑगस्टपासून देशभरात ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सीबीएसईच्या CBSE घेण्यात येणाऱ्या दहावी- बारावीची फेरपरीक्षा Re Examination आज 25 ऑगस्टपासून देशभरात ऑफलाइन Offline पद्धतीने होणार आहेत. सीबीएसई बोर्डाचे खासगी विद्यार्थी तसेच जुलै महिन्यात अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या निकालावर result असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांकरिता students ही परीक्षा होत आहे.

१० वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा माहिती- तंत्रज्ञानाच्या पेपरने सुरू करण्यात येणार असून, गणिताचा Mathematics पेपर हा शेवटचा राहणार आहे. दुसरीकडे १२ वीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असणार आहे. होम सायन्सचा शेवटचा पेपर असणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. या परीक्षांचा निकाल साधारण ३० सप्टेंबरपर्यंत लागण्याची चिन्हे आहेत.

हे देखील पहा-

कोरोना Corona काळात या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सीबीएसई बोर्डाने जाहीर केले आहे. परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यांसोबत हॉल तिकीट Hall tickets असणे, आवश्यक आहे. हॉल तिकिटाशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

परीक्षा केंद्रावर प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांनी मास्क Mask लावणे, तसेच ठरावीक वेळेनंतर सॅनिटायझरचा Sanitizer वापर करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी स्वतच्याच वस्तूंचा वापर करावा. कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण इतर विद्यार्थ्यांबरोबर करू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आले आहेत. तसेच नोंदणी करून या ऑफलाइन परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास अंतर्गत मूल्यमापन धोरणानुसार मिळणाऱ्या गुणांना अंतिम गुण मानले जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT