CBSE announces tentative schedule for 2026 Class 10 and 12 board exams; 45 lakh students to appear. saam tv
महाराष्ट्र

CBSEने १०वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचं टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर

CBSE Board Exam 2026 : सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर केलंय. बोर्डाच्या मते, २०२६ च्या परीक्षेला अंदाजे ४५ लाख विद्यार्थी बसतील.

Bharat Jadhav

  • CBSEने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर केले.

  • परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ ते १५ जुलै २०२६ दरम्यान होणार आहेत.

  • साधारण ४५ लाख विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतील.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर केलंय. अधिकृत CBSE अधिसूचनेनुसार, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ ते १५ जुलै २०२६ दरम्यान घेतल्या जातील. बोर्डानुसार,वर्ष २०२६ च्या परीक्षेत साधारण ४५ लाख विद्यार्थी बसतील. ही परीक्षा २०४ विषयांसाठी भारतात आणि २६ परदेशातील परीक्षा केंद्रात परीक्षा घेतली जाईल.

बोर्डाने असेही म्हटले आहे ही एक टेंटेटिव्ह तारीख आहे. विद्यार्थ्यांना अंतिम यादी मिळाल्यानंतर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची अंतिम तारीखपत्रके जाहीर केली जातील. सीबीएसईकडून १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे टेंटेटिव्ह वेळापत्रक जारी करण्यात आलंय. सीबीएसई कडून १७ फेब्रुवारी ते १५ जुलै दरम्यान खालील परीक्षा घेतल्या जातील.

दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षा

क्रीडा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा (बारावी)

दुसरी बोर्ड परीक्षा (दहावी)

पूरक परीक्षा (बारावी)

१० दिवसांनी परीक्षांचे मूल्यांकन

सीबीएसईच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, प्रत्येक परीक्षेनंतर १० दिवसांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू होईल. यासह प्रत्येक विषयाच्या मूल्यांकनासाठी १२ दिवसांचे लक्ष्य ठेवण्यात आलंय. उदाहरणार्थ, जर बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर २० फेब्रुवारी रोजी झाला तर या पेपरचे मूल्यांकन ३ मार्च २०२६ रोजी सुरू होईल आणि १५ मार्चपर्यंत चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT