Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime: प्रेमात जात आडवी आली! भावाने बहिणीला डोंगरावरून दिलं ढकलून, घटनेचा थरारक VIDEO समोर

Brother Pushes Sister Off Cliff: संभाजीनगरमध्ये भावाने बहिणीची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी भावाला अटक केली असून चौकशीतून धक्कादायक कारण समोर आले आहे.

Priya More

प्रेमात जात आडवी आली अन् भावानेच आपल्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. गावातील तरुणाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने चुलत भावानेच आपल्या बहिणीला डोंगरावरून ढकलून देत तिची हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या १७ तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाळूज परिसरात सोमवारी दुपारी घडली. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बहिणीला ढकलून दिलेल्या डोंगराच्या खाली क्रिकेटच्या मॅचदरम्यान सुरू असलेल्या कॅमेऱ्यात भाऊ बहीण डोंगरावर असताना कैद झालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या श्रीराम कॉलनीमध्ये राहणारी तरुणी बारावीमध्ये शिकत होती. तिचे वडील पूजापाठ करतात. तिचे गावातील एका तरुणाशी सूत जुळल्याने दोघेही पळून गेले होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी समजावून तिला परत आणले होते. दरम्यान कुटुंबीयांनी तरुणीचे समुपदेशन करण्यासाठी तिला वाळूज परिसरातील वळदगाव येथे काकाच्या घरी आणून सोडले.

तरुणीचे काका आणि भाऊ तिचे नेहमी समुपदेशन करत होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास तरुणीचा चुलतभाऊ ऋषीकेश उर्फ वैभव शेरकर तिला दुचाकीवरून वाळूज परिसरातील सोलापूर- धुळे हायवेजवळील खवड्या डोंगरावर घेऊन गेला होता. तेथे तो नम्रताला समजावून सांगत होता. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या ऋषिकेशने तिला रागाच्या भरात डोंगरावरून खाली ढकलून दिले. ती २०० फूट उंचावरून खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

बहिणीचा मृत्यू झाल्याचे समजताच ऋषिकेशने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र तेथील काही दक्ष नागरीकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला डोंगराच्या पायथ्यांशी पकडून ठेवत पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुध्द अवस्थेत असेलल्या तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मृत तरुणीचा भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ऋषीकेशविरोधात सातारा पोलिस ठाण्यात मारामाऱ्या करणे, प्राणघातक हल्ले करणे असे गुन्हे दाखल आहेत. तो या गुन्ह्यात हर्सुल जेलची हवा खाऊन आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऋषिकेश बहिणीची हत्या करून डोंगरावरून खाली येत असतानाचा आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

प्रेमात जात आडवी आल्याने भावाने बहिणीची हत्या केली. १७ वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर हे वेगवेगळ्या जातीचे होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होत होता. त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते. त्यांना शोधून आणून कुटुंबीयांनी तरुणीचे समुपदेशन केले. मात्र तरुणी ऐकत नसल्याने ऋषिकेशने बहिणीला डोंगरावरून ढकलून देऊन तिची हत्या केली असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT