Breaking Solapur : काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह 12 जणांवर गुन्हे दाखल विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

Breaking Solapur : काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह 12 जणांवर गुन्हे दाखल

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश शहरात लागू असताना मास्क न घालणे, सोशल डिस्टन्स न पाळणे तसेच कोरोना प्रतिबंधक सर्व नियम तोडून गर्दी केल्याप्रकरणी नूतन काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह पाटील यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवार 9 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. या कार्यक्रमादरम्यान पोलीस आयुक्त यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश शहरात लागू असताना मास्क न घालणे, सोशल डिस्टन्स न पाळणे असे कोरोना प्रतिबंधक सर्व नियम तोडून गर्दी केल्याप्रकरणी नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील बारा प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

जेल रोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी गुलाबबाबा पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 1) अर्जुनराव पाटील 2) प्रकाश वाले 3) संजय हेमगडडी 4) अमोल पुजारी 5) सुरेश हसापुरे 6) अशोक देवकते 7) गणेश डोंगरे 8) बाबा करगुळे 9) विनोद भोसले 10) बसवराज बगले 11) श्रीमती हेमा चिंचोळकर 12) धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

SCROLL FOR NEXT