Police  Saam Tv
महाराष्ट्र

Satara: पाेलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली Car; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

गुरुवारी एका गुन्ह्याच्या चाैकशी राेहन वाघमारे यास पाेलिसांनी बाेलावले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : पाेलिस उपनिरिक्षक बशिर मुल्ला यांच्या अंगावर चार चाकी घालण्याचा प्रयत्न केल्याने शाहूपूरी पाेलिसांनी (police) आझादनगर (सातारा) (satara) येथील बांधकाम व्यावसायिक राेहन बाळासाहेब वाघमारे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा (crime) दाखल केला आहे. याबाबतची माहिती पाेलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली. (satara latest marathi news)

पतंगे म्हणाले फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रिया सुरु करत असताना पळून जाण्याचा प्रयत्न राेहन वाघमारेने गुरुवारी केला. हे करीत असताना त्याने पाेलिस उपनिरिक्षक मुल्ला यांच्या अंगावर चार चाकी वाहन घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे मुल्ला यांना दुखापत देखील झाली. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या घटनेत इतर पाेलिस कर्मचारी यांना देखील वाघमारे याने धक्काबुक्की केली आहे. त्यानूसार वाघमारे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पतंगे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

South Chutney Recipe : ना नारळ ना टोमॅटो; साऊथ इंडियन नाश्त्यासोबत स्वादिष्ट लागते 'ही' चटपटीत चटणी, बनवायला खूपच सोपी

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखची गगन भरारी! 'राजा शिवाजी'ची १०० कोटींच्या क्लबमध्ये दमदार एन्ट्री, लवकरच रचणार मोठा इतिहास

Maharashtra Heatwave : राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? वाचा हवामानाचा अंदाज

जिल्हा परिषद भरतीत महाघोटाळा? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली सरकारी नोकरी, महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT