बेकायदेशीर बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी पडळकरांवर गुन्हा दाखल SaamTv विजय पाटील
महाराष्ट्र

बेकायदेशीर बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी पडळकरांवर गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बेकायदेशीर व विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी त्यांच्या ४१ कार्यकर्त्यांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : गेल्या आठ्वड्याभरापासून राज्यभरात बैलगाडा शर्यतीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनीदेखील या महत्वपूर्ण तसेच शेतकऱ्यांशी थेट निगडित असणाऱ्या व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा मुद्दा मांडत बैलगाडा शर्यतीलवरील बंदी उठवण्यासाठी रान उठवले आहे.

हे देखील पहा -

या बैलगाडा शर्यतीबाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या नेत्यांपैकी एक असणारे भाजपचे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बेकायदेशीर व विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी त्यांच्या ४१ कार्यकर्त्यांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर, विनापरवाना सर्वोच्चन्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन सांगलीच्या झरे येथे बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या ४१ कार्यकर्ते वर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदा जमाव जमविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहेर

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोठ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT