चंद्रपूर : भाजपने अन्य पक्षातून आयात केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या भरवशावर भाजपची जनआशीर्वाद यात्रा होत आहेत. सत्ता असेपर्यंत हे मंत्री भाजपमध्ये असतील, अशी प्रतिक्रिया युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी चंद्रपुरात दिली.
हे देखील पहा -
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसैनिक, नेते, आमदार अन्य पक्षात जात असतील तर तो स्थानिक राजकारणाचा मुद्दा असल्याचे मत त्यांनी मांडले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आलेल्या सरदेसाई यांना शिवबंधन तोडणा-या शिवसैनिकांवर प्रश्न विचारला असता त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना हि कार्यकर्ता घडविण्याची फॅक्टरी असल्याचे सरदेसाई यांनी आवर्जून सांगितले. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी चंद्रपुरात कार्यकर्ता आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी हे विधान केले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.