Satara Crime News : सातारा शहरातील मंगळवार पेठेत गोळीबार केल्या प्रकरणी पाेलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. या घटनेतील एका अल्पवयीन मुलाची पाेलीसांनी (police) चाैकशी केली. गरबा दांडियानंतर (garba dandiya) झालेल्या गेले दाेन दिवस या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात देखील माेठ्या प्रमाणात रंगली आहे. (Satara Latest Marathi News)
विजयादशमीच्या आदल्या रात्री दांडिया नंतर झालेल्या वादातून काही युवकांनी एकाचा पाठलाग करत मनामती चौकात गोळीबार केला. त्यामुळे परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण हाेते. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आणि दाखल तक्रारीनूसार यश संजय बीडकर हा युवक बुधवारी त्याच्या मित्रांबराेबर दांडिया पाहून घरी जात हाेते. (Breaking Marathi News)
त्याचवेळीस एका ठिकाणी अभिजित भिसे या युवकानं यशचा मित्र सर्वेश महाडिक याच्या पायावर टू व्हिलर घातली. त्यातून वाद झाला. त्यानंतर यश हा मित्रासमवेत त्याठिकाणाहून निघून गेला. काही वेळाने अमीर शेख, अभिजित भिसे हे त्याच्या मित्रांसह मनामती चौकात आले. तेथे यश बीडकरला पाहून अमीर शेखने पिस्तूल काढत. तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत शेखने यशच्या दिशेने गोळी झाडली. ती त्याने चुकवली.
हा प्रकार सुरु असताना तेथे स्थानिक रहिवासी आले. त्यांना देखील शेख याने दम भरत गाेळीबार केला. या प्रकारामुळे रहिवासी घाबरले. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांनी अमीर शेख (रा. वनवासवाडी), अभिजित भिसे (रा. यश ढाब्यामागे, कोंडवे), साहिल सावंत (रा. कोटेश्वर मंदिराजवळ, शुक्रवार पेठ) , आहत (पूर्ण नाव, पत्ता नाही) , यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.