MLA Santosh Bangar  Saam TV
महाराष्ट्र

Santosh Bangar News: आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ; प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Santosh Bangar News: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह महिला प्राध्यापक आणि पदाधिकाऱ्यांसह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. (Latest Santosh Bangar News)

मिळालेल्या माहितीनुसार, आता आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, मारहाण करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार संतोष बांगर यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षभरात आमदार संतोष बांगर यांनी अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदारांना मारहाण केली आहे. अशात आता थेट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना महाविद्यालयात जाऊन मारहाण केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान प्राचार्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला होता. "त्यांनी एका महिलेवर अत्याचार केला.महिलेची अब्रु चव्हाट्यावर येऊनये म्हणून आम्ही गप्प बसलो. नाहीतर या प्राचार्यांवर आम्ही गुन्हा दाखल केला असता. सरकारमध्ये असलं म्हणून आवाज उठवायचा नाही का? आम्ही काय हातात बांगड्या घातल्या आहेत का?", असं संतोष बांगर यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्को यादीत समावेश

Raigad To Shivneri Travel: रायगडाहून शिवनेरीकडे कसे कराल प्रवास? जाणून घ्या सर्वोत्तम रस्ते मार्ग आणि ट्रॅव्हल टिप्स

Akkha Masoor Bhaji Recipe : अक्खा मसूर भाजी अन् गरमागरम चपाती, मुलांच्या टिफिनचा हेल्दी बेत

Air India Plane Crash: 'टेकऑफनंतर ३ सेकंदात दोन्ही इंजिन बंद', २७५ जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

Tabu : घट्ट मिठी अन् तोंड भरून कौतुक; महेश मांजरेकरांना पुरस्कार देताना तब्बू मराठी भाषेत झाली व्यक्त, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT