Aurangabad News Navneet Tapadia Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News : माता-पित्याच्या कलहाने मुलीचे केले वाटोळे; बालविवाह प्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिक्षण घेण्याच्या कोवळ्या वयात या मुलीला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे.

Ruchika Jadhav

नवनीत तापडिया

Aurangabad News : बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरी देखील खेड्यापाड्यात अशा घटना घडताना दिसतात. अशात औरंगाबादमध्ये देखील अशीच एक चिड आणणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचं तिच्या कुटुंबियांनी लग्न लावून दिलं आहे. आता या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Aurangabad News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अवघ्या १५ वर्षांची होती. शिक्षण घेण्याच्या कोवळ्या वयात या मुलीला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. तिच्या डोळ्यासमोर तिच्या आई बाबांनी आपले स्वतंत्र संसार थाटले. ही घटना तिच्यासाठी फार मोठी होती. यातून ती स्वत:ला सावरत नाही तोच तिच्या आई बाबांनी तिचे लग्न लावून दिले.

पती-पत्नीने स्वतंत्र संसार थाटल्यामुळे स्वता:च्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या पित्यासह ८ जणांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीता ही १५ वर्षांची आहे. तिच्या आईवडलांचे पटत नसल्यामुळे त्यांनी आपापले स्वतंत्र संसार थाटले. पण स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हैद्राबातल्या आमिरखान हनिफखा याच्याशी जबरदस्ती लग्न लावून दिले.

ही आपबिती पीडितेने भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी तिचे आई- वडील,आजी, पती आमिर आणि इतर ४ जणांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT