Anil Parab,  Saam TV
महाराष्ट्र

Anil Parab News: मोठी बातमी! अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मारहाण प्रकरणात चार जणांना अटक

Anil Parab: याप्रकरणी आता मुंबईच्या वाकोला पोलिसांनी शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख एडवोकेट अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Political News: महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयातील असिस्टंट इंजिनियर पाटील यांना काल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. याप्रकरणी आता मुंबईच्या वाकोला पोलिसांनी शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

अनिल परब (Anil Parab) यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इतर फरार असलेल्या आरोपींचा वाकोला पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कलम 353, 332, 506 आणि 34 भादवी नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम,शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केली.

सध्या वाकोला पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून फरार आरोपीची धरपकड सुरू केली आहे. या मारहाणीनंतर वाकोला पोलिसांनी 13 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर यांतील काही जणांना सोडून देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT