गर्भपाताच्या औषधांची राज्यभर विक्री नांदेडमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल SaamTv
महाराष्ट्र

गर्भपाताच्या औषधांची राज्यभर विक्री नांदेडमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल

गर्भपाताच्या औषधांची राज्यभर विक्री नांदेडच्या मेट्रो फार्मा चे राज्यभर नेटवर्क नांदेडमध्ये पाच जणां विरोधात गुन्हा दाखल

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

राज्यात गर्भपाताच्या औषधाच्या अवैध विक्रीचे प्रकरण ताजे असतानाच नांदेडमध्ये देखील अवैधरित्या गर्भपाताची औषधी राज्यातील अनेक भागात विक्री करणाऱ्या मेट्रो फार्मा एजन्सीच्या मालकासह पाच जणां विरोधात काल भाग्यनगर पोलीस ठाण्यात औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे. Case filed in Nanded for sale of abortion drugs in the state

मेट्रो फार्मा Metro Farma चे मालती दिपक भोरगे, मार्केटिंग प्रतिनिधी प्रकाश लोखंडे, बुध्दानंद थोरात, मयुर बेलापूरे आणि मयुर लोले असं गुन्हा case file दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या (Food and Drug administration) च्या तपासात मेट्रो फार्मा चा हा काळा धंदा उघडकीस आला. मेट्रो फार्माने कोल्हापूर, सातारा, पुणे, परभणी उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यातील डॉक्टरांना औषधे पुरविल्याचे दाखविण्यात आले मात्र प्रत्यक्षात गर्भपाताची औषध मेट्रो फार्मा ने पुरवठा केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून मेट्रो फार्मा च्या पाच जणां विरोधात औषधींचा गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्ये साठी विक्री केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

गर्भपाताची औषधी विक्री बाबत शासनाचे कडक निर्बंध असताना सर्रास या औषधांची विक्री केली जात असल्याने या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT