Rajasthan Cm son  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल; फसवणुकीचा आरोप

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्या विरोधात नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्या विरोधात नाशिक (Nashik) येथील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे व्यावसायिक सुशील भालचंद्र पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये वैभव गेहलोत यांच्याविरोधामध्ये फसवणुकीचा आरोप (Allegations) करण्यात आला आहे. महाराष्ट्रामधील नाशिक येथील पर्यटन विभागाच्या ई- टॉयलेट बरोबरच इतर विभागामध्ये निविदा काढण्याच्या नावाखाली ६ कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप पाटील यांनी गेहलोत यांच्यावर करण्यात आला आहे. (Case filed against Rajasthan Chief Minister son)

दरम्यान, १७ मार्चला नाशिकच्या गंगापूर पोलीस (Police) ठाण्यात वैभव गेहलोत यांच्याबरोबरच १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गुजरात (Gujarat) काँग्रेसचे सचिव पुरुषोत्तम वालेरा आहे. वलेरा यांचे वडील पुरुषोत्तम भाई वालेरा हे देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पाटील यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये सांगितले आहे की, सचिन वलेराने स्वत:ला जाहिरात व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी १३ राज्यात (state) पेट्रोल पंपांवर जाहिरातींचे कंत्राट असल्याचे सांगितले होते.

हे देखील पहा-

यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री (Rajasthan CM) आणि त्यांच्या मुलाशी आपले चांगले संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्यांच्या बरोबर कामात पैसे गुंतवले तर भरपूर कमाई होणार आहे, असे आश्वासन सचिनने दिल्याचे पाटील यांनी सांगितले होते. तुम्हाला फक्त नावापुरतेच निविदेत सहभागी व्हायचे आहे, असे पाटील यांना त्यावेळी सांगितले होते. वैभव गेहलोत हे उर्वरित काम बघतील, असे त्यांनी सांगितले होते. या संपूर्ण गुंतवणुकीची माहिती सचिनने सुशील पाटील यांना दिली होती. राजस्थान सरकारची कथित निविदा परिपत्रके सचिनने दाखवली असली तरी ती सर्व बनावट असल्याचे नंतर आढळून आले आहे.

सचिनच्या सांगण्यानुसार सुमारे ६ कोटी ८० लाख रुपये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले होते. नंतर अनेकवेळा त्याने सचिनकडे पैसे देखील मागितले होते. मात्र, तो टाळत राहिला आणि नंतर त्याचा फोन देखील येणे बंद झाले होते. यानंतर पाटील यांनी कोर्टामार्फत सचिनभाई पुरुषोत्तम भाई वालेरा, वैभव गेहलोत, किशन कँटेलिया, सरदारसिंग चौहान, प्रवीणसिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई मकवाल, निवभाई महेशभाई वीरमाभट, विश्वरंजन मोहंती, राजबीर सिंग शेखावत, प्रग्नेशकुमार विनोदचंद्र, प्रकाश कुमार, राजेंद्रभाई मकवाल. देसाई, सावनकुमार ए. पारनेर, ऋषिता शहा व विराज गंवाल यांच्यावर आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट निविदा कागदपत्रे दाखवून पैसे हडप करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर वैभव गेहलोत यांनी उत्तर दिले असून, सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. सध्या एका प्रकरणामध्ये मीडियात माझ्या नावाची चर्चा सुरु आहे. त्या प्रकरणात माझे देखील नाव टाकण्यात आले आहे. मला त्याविषयी कोणतीही माहिती नाही. माझा या सगळ्याशी काही देखील संबंध नाही. आपणा सर्वांना माहितच आहे की, निवडणुका जवळ आल्या की खोटे आरोप लावले जात असतात.

तसेच कट कारस्थान रचली जातात असे वैभव गेहलोत यांनी यावेळी सांगितले आहे. आता या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापताना दिसून येत आहे. सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. सोमवारी अधिवेशन सुरु झाल्यानंतर या प्रकरणावरुन सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांनी या प्रकरणाबाबत ट्विट करत वैभववर दाखल झालेल्या गुन्ह्याची सत्यता सर्वांसमोर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT