Solapur: खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल Saam tv
महाराष्ट्र

Solapur: खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल

विश्वभूषण लिमये

सोलापूर: माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर (Ranjeet singh Nimbalkar), भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह अन्य बरा जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात काल केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांवार गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्षांनी शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र, कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सोलापूरात भाजपा आणि शिवसेना आमने सामने आलेले पाहायले मिळाले. काल भाजप जिल्हाध्यक्षांच्या वतीने शक्तीप्रदर्शन केले त्यात खासदारांचा देखील समावेश होता. त्यामुळे मागील गोष्टींचा रोश काढण्यासाठी शिवसेनेने तक्रार केली का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. खासदार आणि जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हात भाजप कार्यकर्तांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT