Atul Bhatkhalkar Saam Tv
महाराष्ट्र

Atul Bhatkhalkar : सोनिया गांधींविरोधात आक्षेपार्ह ट्वीट; आमदार अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पुणे सायबर पोलिसांनी भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. कॉंग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधी यांच्याबाबत भातखळकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सुरुवातीला सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले असता त्यांना कोरोना झाल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणावर अतुल भातखळकर यांनी त्यावर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कोरोनाचा ईडी व्हेरिएंट असल्याच म्हटलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

हे देखील पाहा -

अतुल भातखळकर यांच्याविरोधात संदीप भुजबळ यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा हा अदखलपात्र असल्याचं समजतंय. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांची चौकशी सुद्धा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अतुल भातखळकर यांच्यापाठोपाठ भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही सोनिया आणि राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं होतं. 'हा देश संविधानाने चालतो. राहुल आणि सोनिया गांधी हे कायद्याच्या वर नाहीत हे ऐका. दोघेही जामिनावर बाहेर आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या नेत्यांचे कोणते अनुचित वर्तन योग्य नाही, हे अत्यंत कडक शब्दात सांगणे आवश्यक आहे. तुम्हाला कोर्टात जामीन मिळाला आहे आणि त्या जामीनाच्या आदेशाने तुम्हाला आरोपी मानले जाते. ही राजकीय द्वेषाची बाब असल्याचे सांगत तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात गेलात. दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले जाणार नाही', असं भाटिया म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT