वीज तोडणीस विरोध भोवला; सिद्धेश्वर कारखान्याच्या 'एम डी'सह 300 जणांवर गुन्हा दाखल विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

वीज तोडणीस विरोध भोवला; सिद्धेश्वर कारखान्याच्या 'एम डी'सह 300 जणांवर गुन्हा दाखल

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वीज तोडणीवर बेकायदेशीर जमाव जमवून विरोध केल्याप्रकरणी कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह 300 जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वीज तोडणीवर बेकायदेशीर जमाव जमवून विरोध केल्याप्रकरणी कारखान्याच्या कार्यकारी संचालकासह 300 जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिमणी प्रकारणबाबत आजपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे.

श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्‍शन तोडल्यानंतर मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कारखाना बंद ठेवावा लागणार, ऊस उत्पादक अडचणीत येतील या हेतूने महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी तीव्र विरोध केला. यामध्ये काल एक तरुण जीव धोक्‍यात घालून महावितरणच्या धोकादायक टॉवरवर चढला. नागनाथ चौधरी या तरूणाविरुध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तत्पूर्वी, कारवाई कराल तर तारेला धरेन, असा इशारा त्याने दिला होता. उपस्थित नागरिकांनीही कारवाईला विरोध केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करताच परतावे लागणार आहे. जलसंपदा विभागाने होटगी तलवातून कारखान्याला होणारा पाणी पुरवठा बंद करून पंप हाऊस सिल करून टाकले आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महावितरणचे अधिकारी कारखान्याची वीज तोडण्यासाठी गेले होते.

तत्पूर्वी, कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या पत्नी, मुले, कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या समर्थकांनी घटनास्थानी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार हे त्यांच्या लवाजम्यासह त्याठिकाणी होते. परंतु, नागरिकांचा आक्रोश पाहून त्यांनीही काहीच कारवाई केली नाही. त्यावेळी उपस्थितांनी "सिध्देश्‍वर महाराज की जय' अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, तुम्ही कारवाई करताना त्या तरुणाला काही झाल्यास त्याल सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा उपस्थितांनी महावितरण व पोलिस अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे कारवाईविनाच त्यांना परतावे लागले. चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विरोध पाहून चिमणी पाडकामाची कारवाई मागे घेतली होती. तोच अनुभव काल (शनिवारी) पुन्हा आला.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे प्रथमच एकाच मंचावर! कुठे आणि कारण काय? VIDEO

व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं पायांमध्ये दिसतात; 'ही' लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update: मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई करावी विजय कुंभार यांची पंतप्रधानांकडे मागणी

Indian Student News : दिवाळी साजरी करताना धाडकन खाली कोसळला, दुबईत १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Bull Attack : दुचाकींचा पाठलाग करत मोकाट बैलाचा हल्ला; हल्ल्यात लहान मुलगा जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT