मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल... Saam Tv
महाराष्ट्र

मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल...

करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भारत नागणे

पंढरपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केल्याप्रकरणी करमाळ्याच्या मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्यावर रात्री उशिरा करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील गाळप हंगामातील सुमारे 600 कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे.

हे देखील पहा -

थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या दरम्यान काल कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी व हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिग्विजय बागल यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

Janjira Fort : आनंदाची बातमी! जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, 'या' कारणामुळे होता बंद

SCROLL FOR NEXT