praniti shinde
praniti shinde 
महाराष्ट्र

आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह माेहिते- पाटलांवर गुन्हा दाखल

विश्वभूषण लिमये

गोरगरिबांनी जगाव कसं असा प्रश्न यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

साेलापूर : वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात काॅंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच साेलापूरात केंद्र सरकारच्या धाेरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन छेडले हाेते. या आंदाेलनात काॅंग्रेसच्या मान्यवर नेत्यांसह कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले हाेते. त्यामुळे पाेलिसांनी आमदार प्रणिती शिंदेंसह Praniti Shinde १५ जणांवर गर्दी जमविल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. case-charged-on-congress-leader-praniti-shinde-agitation-petrol-diesel-solapur-sml80

हा गुन्हा सोलापुरातील सदरबझार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती पाेलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली. काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियम आखून दिले आहेत. त्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कलम १८८ प्रमाणे गुन्हा केल्याचे पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आमदार प्रणिती शिंदेंसह जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष प्रकाश वाले ही प्रमुख नावे आहे. या सर्वांसह कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: सोलापुरात निकालाआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT