राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधात 'गाडी ढकलो' आंदोलन  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधात 'गाडी ढकलो' आंदोलन

इंधन दरवाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या विरोधात लातूर जिल्ह्यातील औसा येथे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षीरसागर

लातूर : देशात पेट्रोल व डिझेल दरवाढ सातत्याने सुरु आहे.यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल झालं आहे. इंधन दरवाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या विरोधात लातूर जिल्ह्यातील औसा येथे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. Car-pushing agitation by NCP against fuel price hike

हे देखील पहा -

औसा शहरातील मुख्य रस्त्यावरील मोडवरून तहसील कार्यालयापर्यंत चारचाकी वाहनाला दोरखंडाने बांधून ढकलत आणले मोदी हटाव देश बचाव, पेट्रोल डीझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनानंतर नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी तहसीलदार शोभा पुजारी यांना निवेदन दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष जावेद शेख, भरत सूर्यवंशी, आरोग्य सभापती मेहराज शेख, शाकेर सय्यद गोविंद जाधव, शहराध्यक्ष अविनाश टिके, गजेश्वर शिंदे, कृष्णा सावळकर, रुपेश दुधनकर आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख म्हणाले की, देशात दुष्काळ अतिवृष्टी व गारपिटीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत भाजीपाल्या पासून किराणा बांधकाम व अन्य सर्व वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत उत्त्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने जगणं कठीण झालं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT