संभाजी राजेंनी छत्रपतींच्या विचारांचे देखील वारसदार व्हावे - प्रकाश शेंडगे

संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणसंदर्भात भूमिका स्पष्ट करायला हवी. संभाजी राजे हे स्पष्टपणे ओबीसींचे आरक्षण मागत नाही. पण ओबीसींमध्ये येण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.
संभाजी राजेंनी छत्रपतींच्या विचारांचे देखील वारसदार व्हावे - प्रकाश शेंडगे
संभाजी राजेंनी छत्रपतींच्या विचारांचे देखील वारसदार व्हावे - प्रकाश शेंडगेजयेश गावंडे
Published On

जयेश गावंडे

अकोला - संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणसंदर्भात भूमिका स्पष्ट करायला हवी. संभाजी राजे हे स्पष्टपणे ओबीसींचे आरक्षण मागत नाही. पण ओबीसींमध्ये येण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वारसदार आहेत. त्यांनी छत्रपतींच्या विचारांचे देखील वारसदार व्हावे, असा टोला ओबीसी जनमोर्चाचे नेते, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी लगावला. Sambhaji Raje should also inherit Chhatrapati's thoughts - Prakash Anna Shendge

हे देखील पहा -

अकोल्यातील केडीया प्लॉट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाची पुनर्विचार याचिका खारीज केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या पुनर्विचार याचिकेचा विषय संपलेला आहे. काही नेते म्हणतात की, आता आम्हाला ओबीसीत घ्या. परंतु, आता ओबीसीचा मार्ग जो आहे तो 102 व्या घटना दुरुस्तीमध्ये लॉक केलेला आहे.

आता एखाद्या जमातीला ओबीसी मध्ये यायचे असले तर कलम 138 ब आणि 342 या नुसार दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. संभाजीराजे यांना माझे आवाहन आहे, तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्हाला नक्की काय करायचे आहे. मराठा समाजाला ओपनमध्ये आरक्षण द्यायचे आहे की ओबीसीत आरक्षण द्यायचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संभाजी राजेंनी छत्रपतींच्या विचारांचे देखील वारसदार व्हावे - प्रकाश शेंडगे
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजी सेनेचे रेल्वे रोको आंदोलन

मागासवर्गीयांची सर्व प्रक्रिया मराठा समाजाला करायला लावणं, हे त्यांच्या भविष्यासाठी खेळ होईल. त्यांना साधासोपा मार्ग आहे ईडब्ल्यूएस, जे आहे ते मराठ्यांना उपलब्ध आहे. तुम्ही राजे आहे, तुमचे केंद्रात वजन आहे. तुम्ही तिथे जा, पंतप्रधान मोदींना भेटा, तिथे घटनादुरुस्ती करा. आणखी पाच टक्के वाढ करा, जाटाना सोबत घ्या, तुम्ही पाटीदारांना सोबत घ्या, हे करण्याऐवजी तुम्ही ओबीसींचे जे कलम आहे त्यांच्यामध्ये मागणी करणं, हे ओबीसींना मुळीच मान्य नाही, असे ही ते म्हणाले.

ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारसदार आहेत. त्यांनी विचारांचे वारसदार व्हावे, असा खोचक टोला त्यांनी संभाजीराजेंना मारला. हा जो बहुजन समाज जो आहे, तो सुद्धा महाराष्ट्राचा घटक आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात मावळ्यांनी रक्त सांडलेल आहे. त्यांचे जे आरक्षण आहे ते टिकविण्याची जबाबदारी ही सुद्धा संभाजीराजे यांची आहे, असेही ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com