अमरावतीत कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी

एका कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नदीच्या दरीमध्ये कार कोसळून चालकसह प्रवासी ठार झाल्याची खळबळजनक घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : वर्धा Vardha जिल्ह्यामधील चिस्तूर या गावाजवळ अमरावतीहून- नागपूरकडे जात असलेल्या, एका कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नदीच्या दरीमध्ये कार कोसळून चालकसह प्रवासी ठार Dead झाल्याची खळबळजनक घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

तळेगांव श्यामजीपंत येथील चिस्तुर गावाजवळ एका MH-३० P-३२१४ या क्रमांकाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण थोडक्यात बचावला आहे. मृतांमध्ये अमित गोयते (वय 32) रा.बडनेरा, शुभम गारोडे ( वय 25) रा.अमरावती, आशिष माटे रा. राजुरा जि.अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले आहेत. तर शुभम भोयर हा सुखरूप बचावला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर एकाचा मृतदेह तर चक्क झाडावर अडकला होता.

दुसरा मृतदेह वानातत अडकलेला होता. तर तिसऱ्या व्यक्तीचा मृतदेह बाजूला पडून होता. पोलिसांनी लावलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, सांगण्यात येत आहे की, त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा. तसेच कारणकी, मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी चक्क उडाली आणि बाजूला फेकली असावी. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, सुधीर डांगे, जमादार राजेश साहू, श्याम गहाट, राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर, रमेश परबत, विजय उईके यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT