nashik kharat news saam TV marathi
महाराष्ट्र

दैवी शक्तीच्या नावाने खरातची काळी कृत्ये, नराधम 'कॅप्टन' महिलांना कसा ओढायचा जाळ्यात? वाचा अत्याचाराची मोडस ऑपरेंडी

captain Ashok Kharat Nashik Crime News: तंत्रमंत्राची भीती दाखवून महिलांवरच्या अत्याचाराचे तब्बल 58 व्हिडीओ खरातकडे सापडलेत.....त्यामुळे खरात महाराष्ट्राचा जेफ्री एपस्टीन आहे का?

Bharat Mohalkar

नराधम कॅप्टन खरातला अटक केली... मात्र तो महिलांवर अत्याचार कसा करायचा... त्याची मोडस ऑपरेंडी कशी होती... पाहूयात नराधम खरातच्या काळ्या कारनाम्यांवरचा हा स्पेशल रिपोर्ट....

ज्योतिष शास्त्राच्या नावानं महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार करणारा हा नराधम आहे कॅप्टन अशोक खरात.... या नराधमाचा आणखी एक काळा कारनामा समोर आलाय... एका फिर्यादी महिलेनं कॅप्टन खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पाढाच वाचलाय... कार्यालयात बोलावून गुंगीचं औषध देत आणि होणारा नवरा मरण्याची भीती घालत अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं केलाय.. या नराधमाची मोडस ऑपरेंडी कशी होती? पाहूयात...

2019 ठिकाण- नाशिकमधील कॅनडा कॉर्नरचं खरातचं अलिशान ऑफिस पीडिता तिच्या दाजीसोबत खरातच्या कार्यालयात गेली होती... यावेळी खरातनं मला दैवी शक्तीच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करतो. तुझे श्रीमंत घरात लग्न होईल. तुझं करियरही घडेल, असा विश्वास दिला... त्यासाठी काही विधी करण्याचा सल्ला दिला... पीडितेनं विधी केला... त्यानंतर 2021 मध्ये पीडितेचा साखरपुडा झाला... मात्र काही दिवसातच साखरपुडा मोडला... त्यानंतर खरातनं पीडितेला धीर देत 50 हजार रुपयांचा पुष्कराज खडा घेण्याचा सल्ला दिला... पीडितेनं 50 हजारांचा खडा घेऊन गळ्यात घातला..त्यानंतर 2022 मध्ये तिला स्थळ आलं..लग्नाची बातमी खरातला दिली... खरातनं विश्वास संपादन केल्यानंतर त्याच्या डोक्यात चक्रं फिरायला लागले... आणि त्यानं पीडितेला विधीचं कारण देत नोव्हेंबर 2022 मध्ये कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये बोलावलं... महिला एकटी असल्याचं दिसताच खरातनं संधी साधली.. तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं... प्रसाद म्हणून पेढा खाण्यास दिला... आणि तांब्याच्या भांड्यात असलेलं पाणी पाजलं... त्यामुळे पीडितेला गुंगी आली.. आणि इथंच खरातनं जाळं टाकलं... तु माझी प्रेयसी बनली नाही तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मरेल, अशी भीती घातली... मी तुला पवित्र करत असल्याचं सांगून गुंगीतील महिलेवर अत्याचार केला...

खरातनं एकदा दोनदा नाही तर लग्नानंतरही जोडीनं आशिर्वाद घेण्यासाठी बोलावून पुन्हा पुन्हा अत्याचार केला.. आणि अखेर वैतागून पीडितेनं पोलिसात धाव घेतली... आणि खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं...तंत्रमंत्राची भीती दाखवून महिलांवरच्या अत्याचाराचे तब्बल 58 व्हिडीओ खरातकडे सापडलेत.....त्यामुळे खरात महाराष्ट्राचा जेफ्री एपस्टीन आहे का? या प्रकरणात किती महिलांचं शोषण केलंय... याची माहिती समोर आणून अंधश्रद्धेच्या माध्यमातून महिलांना उद्ध्वस्त करणाऱ्या कॅप्टन खरातसारख्या विकृत प्रवृत्तींना धडकी भरेल, अशी कारवाई कऱण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT