Eknath Shinde Banner in Akola saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

Maharashtra Election Results Today Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आज जाहीर होणार आहे. काही वेळातच मतमोजणी सुरू होईल. पण त्याआधीच मुंबईपासून, पुणे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.

Nandkumar Joshi

विधानसभा निवडणूक निकालाआधीच 'प्रचंड मतांनी विजय, हार्दिक अभिनंदन!, मुख्यमंत्री आमचाच, दादा-भाई मंत्री होणार, विधानसभेवर आमचाच झेंडा, गुलाल आमचाच उधळणार', अशा आशयाचे बॅनर मुंबई, पुणे आणि ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी चौकाचौकात झळकले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अशी महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत आहे.

दुसरीकडे मनसेनेही आपले शंभरहून अधिक उमेदवार रिंगणात उतरवून चुरस निर्माण केली आहे. निकाल आज जाहीर होणार आहेत. पण त्याआधीच राज्यभरात अनेक ठिकाणी गल्लीबोळात, चौकाचौकात उमेदवारांच्या विजयाचे बॅनर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर झालेला नाही. पण मातोश्रीच्या रिंगणात पुन्हा एकदा कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री असा मजकूर असलेला बॅनर झळकलेला आहे.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे बॅनर लक्षवेधी आहे. निकालाआधीच त्यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. सोशल मीडियावर ते बॅनर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सिंधुदुर्गमधील कणकवलीत नितेश राणे यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकले आहेत. पुन्हा आमदार नितेश राणे असा मजकूर असलेले बॅनर कणकवलीत प्रत्येक चौकाचौकात झळकले आहेत. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'जागा झाला कोकणचा स्वाभिमान, हिंदुत्वाचा राखला मान' असा आशयही अनेक बॅनरवर दिसून येत आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघातही निकाल जाहीर होण्याआधीच शिवेंद्रराजे भोसले यांच्या विजयाचे बॅनर संपूर्ण शहरामध्ये, तसेच आजूबाजूच्या तालुक्याच्या परिसरात झळकले आहेत. शिवेंद्रराजे यांचा विजय निश्चित असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे आधीपासूनच या ठिकाणी बॅनर लागले आहेत.

बोईसर विधानसभेवर मशालचा विजय नक्की होणार, लोकांना परिवर्तनाची गरज आहे. विजय आपलाच असल्याचा विश्वास महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बोईसर विधानसभेचे उमेदवार विश्वास वळवी यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास राहिले आहेत. सत्ता आणि मुख्यमंत्रिपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीत दावे- प्रतिदावे करण्यात येत आहेत. महायुतीत मुख्यमंत्रिपदावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दावे करायला सुरुवात केली आहे. त्याआधीच काल रात्री अकोल्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनचे बॅनर लागले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी हे बॅनर लावले आहेत. अकोला शहरातील दुर्गा चौक, सिव्हिल लाईन चौक, बस स्टँड चौक आणि अशोक वाटिका चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम असा विधानसभा निवडणुकीत चुरशीचा सामना रंगला. या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली असतानाच मतदारसंघातील पाबळ येथे निवडणूक निकालापूर्वीच वळसेपाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत.

धाराशिवमध्येही निकालाआधीच तानाजी सावंत यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. तानाजी सावंत हे परंडा विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. वाशी तालुक्यातील तेरखेडा गावात सावंतांच्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत.

माळशिरसमध्ये उत्तम जानकर यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. येथे भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी अटीतटीची लढत झाली. निवडणूक निकालापूर्वीच उत्तम जानकर यांचे माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी विजयाचे व अभिनंदनाचे बॅनर लागलेले आहेत.

लातूरच्या निलंगा मतदारसंघात निकालापूर्वीच संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विजयाचे बॅनर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी लावले आहेत. देवणी येथे उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाच्या एक दिवस आधीच संभाजी पाटील निलंगेकरांचे विजयाचे बॅनर लावले आहेत.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण चौकात दिलीप मोहिते पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागले असून, त्यावर मंत्रीसाहेब असाही उल्लेख केला आहे. खेड आळंदीत महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते - पाटील यांचे मंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत.

खुर्ची कुणासाठी लाडकी? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे ताजे अपडेट इथं वाचा....Live

Maharashtra All Constituency Assembly Election results Updates

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT