Bhandara News Saam Tv
महाराष्ट्र

Bank Robbery : मध्यरात्री कॅनरा बँकेत दरोडा; दबक्या पावलांनी आले, कॅमेरे फोडले अन् लाखो घेऊन पसार

Bhandara Canara Bank Robbery : भंडाऱ्यातील कॅनरा बँकेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदत कॅमेरे फोडून मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

Alisha Khedekar

भंडाऱ्यातील कॅनरा बँकेत मध्यरात्री दरोडा

सुरक्षा यंत्रणेला चकवा देत चोरट्यांनी बँकेत प्रवेश मिळवला

चोरीची नेमकी रक्कम अद्याप अस्पष्ट

परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे

भंडाऱ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला आहे. बँकेच्या सुरक्षा यंत्रणांना धाब्यावर बसवत या दरोडेखोरांनी कॅमेरे फोडत बँकेतील मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नामांकित बँकेत दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथील कॅनरा बँकेच्या शाखेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँकेच्या सुरक्षा यंत्रणेला भेदत आतील कॅमेरे फोडून मोठी रोकड आणि ऐवज लंपास केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

बँकेत प्रवेश मिळवल्यानंतर चोरट्यांनी सर्वात आधी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये.बँकेतून नेमका किती मुद्देमाल, रोकड किंवा दागिने चोरीला गेले, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. बँक व्यवस्थापन आणि पोलीस यांच्या संयुक्त तपासानंतरच चोरीच्या नेमक्या मूल्याचा आकडा समोर येईल.

घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरोडेखोरांचा माग घेण्यासाठी आणि घटनेच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.तालुक्यात घडलेल्या या मोठ्या घटनेमुळे चिखला आणि आसपासच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या ज्वेलरी चोरांचा अद्याप शोध लागला नसून आता बँकेत झालेल्या दरोड्याने गोबरवाही पोलिसांचा कार्यप्रणाली पर नागरिकांचा रोष दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: ड्रग्ज देऊन चौघांकडून सामूहिक बलात्कार, तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही अब्रु लुटली अन् ₹५००००..., थरकाप उडवणारी घटना

बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याविरूद्ध कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा, म्हणाले, 'पोलिसांना दिशाभूल केली...'

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी...

मध्यरात्री लोकलमध्ये डॉक्टरचा पाठलाग; अश्लील हावभाव अन्.. नवी मुंबईतील आरोपीला बेड्या

South Indian Appam : नाश्त्याला घरीच बनवा १० मिनिटांत अप्पम, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT