औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार, खासदारांसह अनेक शिवसेना (ShivSena) पदाधिकारी तसेच नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. एकीकडे औरंगाबाद येथील शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्याला शिंदेंनी ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे जालन्यातील माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. (Arjun Khotkar Latest News)
सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या मध्यस्थीने अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी दिल्लीत ही भेट झाली असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुंबई, ठाणे पाठोपाठ मराठवाड्यातही शिवसेनाला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले अर्जुन खोतकर यांच्यावर नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. सध्या अर्जुन खोतकर हे ईडीच्या रडाडवर आहे. त्यामुळे ईडीची पीडा टळावी म्हणून खोतकर हे शिंदे गटात सामील होऊन भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Arjun Khotkar Eknath Shinde News)
दरम्यान, यापूर्वीही अर्जुन खोतकर यांनी कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. चव्हाणांसोबत हातमिळवणी करून त्यांनी कॉंग्रेससोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नाही तर, छगण भुजबळ यांनीही शिवसेनेतून बंड केल्यानंतर तेव्हाही खोतकरांनी भुजबळ यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, आता अब्दुल सत्तार यांच्या मध्यस्थीने खोतकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील होणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.