Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना आता उत्तर भारतीयांचा पाठिंबा; प्रमुख पदाधिकारी घेणार भेट

उत्तर भारतीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे
cm Eknath Shinde
cm Eknath Shinde saam tv
Published On

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आता आपला गट आणखी मजबूत बनवण्यास सुरूवात केली आहे. सुरुवातीला आमदार नंतर खासदार आणि आता शिवसेनेचे (ShivSena) अनेक नगरसेवक तसेच पदाधिकारी आपल्या गटात सामील करून घेतले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, आता ठाणे, मीरा भाईंदरसह एमएमआर क्षेत्रातील हजारो उत्तर भारतीय व उत्तर भारतीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. (Eknath Shinde News)

cm Eknath Shinde
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिंदे गट देणार उत्तर; शिंदे गटाचा ठरला प्लॅन

आज रात्री ९ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवास्थानी ही भेट घेणार असल्याची माहिती आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि उत्तर भारतीय आघाडीचे विक्रमप्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उत्तर भारतीय बांधवांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करून त्यांना तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर स्थापन झालेल्या युती सरकारला पाठिंबा दिला जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदार, तसेच नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे जे म्हणतील तीच आमची योग्य दिशा असा सूर बंडखोर काढत आहेत. शिंदे यांनी आतापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेऊन 'सब का साथ, सब का विकास' यापद्धतीने काम केलं असल्याचं फुटीर गटाचं म्हणणं आहे. (Eknath Shinde Todays News)

cm Eknath Shinde
Presidential Election 2022 Results: द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? देशाला आज मिळणार नवे राष्ट्रपती!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी याआधी २ वेळा अयोध्या दौरा केला होता. त्यात त्यांच्यासह हजारो उत्तर भारतीय जमले होते. यावरून उत्तर भारतीयांमध्ये शिंदे यांची किती लोकप्रियता आहे हे दिसून येते. एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या याच हिंदुत्ववादी भूमिकेमुळे रामभक्त सर्व उत्तर भारतीय त्यांना पाठिंबा देत असल्याचंही सरनाईक म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com