तरुणाला वाढदिवसाला बोलवलं, बेदम मारलं आणि पोत्यात गुंडाळून पेटवूनही दिलं, बीडमधील अमानवी कृत्य!
तरुणाला वाढदिवसाला बोलवलं, बेदम मारलं आणि पोत्यात गुंडाळून पेटवूनही दिलं, बीडमधील अमानवी कृत्य! Saam Tv
महाराष्ट्र

तरुणाला वाढदिवसाला बोलवलं, बेदम मारलं आणि पोत्यात गुंडाळून पेटवूनही दिलं, बीडमधील अमानवी कृत्य!

विनोद जिरे

बीड : बीडच्या (Beed) धारूर घाटा मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे माणूसकीला आणि मैत्रीला काळीमा लावणारी ही घटना आहे. आपल्या मित्राला वाढदिवसाला बोलावून त्याला बेदम मारहाण (Beat) करत त्याला पेटवून देण्याचा अत्यंत क्रुर प्रकार घडला आहे. कृष्णा अर्जुन गायकवाड (Krishna Arjun Gaikwad) वय 19 असं मारहाण केलेल्या तरुणाचं नाव आहे. (Called the young man for birthday, beat him up)

कृष्णाला वाढदवसाला बोलवून त्याला फक्त बेदम मारहाण करुणच हे नराधम थांबले नाहीत तर त्यांनी त्याला पोत्यात घालून वरती पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं तो रात्रभर वेदनेने विव्हळत रस्त्याच्या कडेलाच पडून होता. आज सकाळी त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका जीप (Jeep Driver) चालकाने त्याला जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर कृष्णाला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल केले. मात्र त्याचं शरीर अर्धवट जळालं असून त्याच्यावरती अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात (Swarati Hospital Ambajogai) उपचार सुरू आहेत.

त्याची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणात दिंद्रुड पोलिसात 4 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या जळीत कांडाच्या घटनेने खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तरुणांना असली अमानवी कृत्य करताना कोणाचीच भिती वाटत नाही की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT