CM Devendra Fadnavis Today Meeting Saam Tv
महाराष्ट्र

Cabinet Meeting: फडणवीस सरकारच्या ५ मोठ्या घोषणा, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

Big Dicision By CM Devendra Fadnavis In Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ मोठ्या घोषणा केल्या. आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले ते वाचा...

Priya More

Summary -

  • फडणवीस सरकारच्या ४ मोठ्या घोषणा

  • आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली

  • आयटी आणि एआय विभागाची स्थापना करणार

  • महावितरणची आर्थिक पुनर्रचना केली जाणार

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान फडणवीस सरकारने मोठ्या घोषणा केल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभाग, नियोजन विभाग, ऊर्जा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्ग हे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा नेमका कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार हे आपण जाणून घेणार आहोत...

माहिती तंत्रज्ञान विभाग -

महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग विकसित भारत २०४७ मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पुर्तीसाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार आहे. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण होणार आहे. राज्यातील माहिती तंत्रज्ञान, एआय, डीजिटल गव्हर्नन्सला गती लाभणार आहे.

नियोजन विभाग -

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) आता कंपनी असणार आहे. सोसायटी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणी रद्द करुन कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत कंपनी स्थापन होणार आहे. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई- पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिच व खाणींचा अभ्यासाला गतीमानता लाभणार आहे.

नियोजन विभाग -

भू-स्थानिक तंत्रज्ञानचा वापर करुन प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, भूस्थानिक नवोप्रक्रम व उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविता येणार आहे.

ऊर्जा विभाग -

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार आहे. शासन हमी असलेल्या कर्जा (३२,६७९ कोटी) साठी भांडवली बाजरात सरकारी रोखे येणार आहे. याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन (Agri Demerger) करण्यात येणार आहे. तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग -

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारणार आहे. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी मिळणार आहे. आपत्तीचा फटका बसलेल्या नागरीकांना गृह कर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे. पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

पुण्यात गुंडगिरीचं साम्राज्य, पोलीस झोपलेले, वसुलीच्या नावाखाली एजंटची गुंडगिरी

Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू

चहा पावडरमुळे किडनी फेल? केमिकलयुक्त चहा पावडर बाजारात?

SCROLL FOR NEXT