'मी नाराज नाही, पण मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझं नाव पाठवलं होतं. मात्र ऐनवेळी नाव कापण्यात आलं, ते कोणी केलं? असा सवाल भाजप आमदार सुधीर मुनंगटीवार यांनी सवाल केलाय. महायुती मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला असून यावेळी ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून सर्वाधिक आमदारांनी शपथ घेतली.
नव्या चेहऱ्यांना संधी भाजपने काही जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू देण्यात आलेल्या आमदारांमध्ये सुधीर मुनंगटीवार सुद्धा आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज आहेत. याबाबत भाष्य करताना मुनंगटीवार यांनी मोठा खुलासा करत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाच सवाल केलाय. विधानसभेचा निकाल लागून १० ते १२ दिवस झाल्यानंतरही महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. शेवटी रविवारी १५ डिसेंबर रोजी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर येथे पार पडला.
विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागला, त्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर मंत्रिपद आणि खाते वाटपावरून महायुतीत चढाओढ सुरू झाली होती. शेवटी त्यावरून मार्ग काढत १५ डिसेंबर रोजी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मात्र मंत्रिपद मिळाले नसल्यानं अनेक आमदार नाराज झालेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.
यात घराणेशाहीतील १३ नेत्यांना स्थान मिळालं. विधानपरिषदेतील एकमेव आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या चेहऱ्यांना संधी देताना भाजपने काही ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आला. यात सुधीर मुनगंटीवार यांचेही नाव आहे. मात्र ऐनवेळी आपलं नाव कापण्यात आल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजप नेते निती गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आपल्यावरती असा कधी प्रसंग येतो, त्यावेळी आपण गडकरी यांचे मार्गदर्शन घेत असतो. मंत्रिमंडळात आपलं नाव नसल्यानं आपण नाराज नाही. मी नेहमी आनंदी असतो. हीच माझी शक्ती आहे. तसेच नाराज राहू मी दुसऱ्याला आनंदी होण्याची संधी देणार नाही. परंतु आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदासाठी तुमचं नाव पाठवलं असल्याचं सांगितलं होतं.
मात्र ऐनवेळी ते नाव कापण्यात आलं ते कोणी कापलं हे मला माहित नाही. का कापण्यात आलं? काय कारण आहे, कोणत्या संघटनेची जबाबदारी आपल्याला देण्यात येणार आहे, याची आपल्याला माहिती नाही, असं मनुगंटीवार म्हणालेत. मुख्यमंत्री फडणवीस जेव्हा भेटतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.