लालपरीच्या प्रवाशांचा खिसा होणार खाली, लवकरच होणार दरवाढ
लालपरीच्या प्रवाशांचा खिसा होणार खाली, लवकरच होणार दरवाढ Saam Tv
महाराष्ट्र

लालपरीच्या प्रवाशांचा खिसा होणार खाली, लवकरच होणार दरवाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : आर्थिक संकटात असलेल्या लालपरी महामंडळाचे ST corporation आर्थिक चाक तोट्याच्या सावटाखाली रुतले आहे. त्यामध्ये डिझेल Diesel, टायर, सुट्या भागांच्या किमती वाढल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. १०० किलोमीटरपर्यंत २५ रुपयांची दरवाढ अपेक्षित असून, प्रवाशांचा खिसा आता खाली होणार आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाउन Lockdown मध्ये लालपरी सेवेला ब्रेक Break लागला आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर देखील पुरेसे प्रवासी नसल्यामुळे रोज कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. यातच लालपरीचा संचित तोटा ७ हजार कोटीच्या वरती येऊन पोहोचला आहे. संकटामधून सावरण्यासाठी भाडेवाढी शिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे लालपरीने १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे.

हे देखील पहा-

त्यावर निर्णयासाठी राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीकडून अभ्यास करण्यात येणार आहे. लवकरच समितीचा अहवाल सादर होण्याचे संकेत मिळत आहेत. लालपरी महामंडळाने या अगोदर जून २०१८ मध्ये दरवाढ करण्यात आली होती. यानंतर डिझेलचे दर हे सातत्याने वाढत आहेत. टायरसह वारंवार लागणाऱ्या सुट्या, भागांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

यामुळे भाडेवाढ अनिवार्य असल्याने, प्रशासनाकडून administration सांगण्यात आले आहे. दरवाढीविषयी प्रवाशांमध्ये संमिश्र भावना आहेत. डिझेलचे दर हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महागाई सातत्याने वाढतच आहे. राज्याची लोकवाहिनी असलेल्या, लालपरीला वाचवायचे असेल, तर दरवाढ सोसावीच लागणार आहे. थोडा भार प्रवासीही वहन करायला तयार आहे. पण, सामान्यांच्या परिस्थितीचा विचार करूनच दरवाढ केली जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: भाजप नेत्यांचा आज राज्यात सभांचा धुराळा; दानवेंच्या प्रचारार्थ अमित शाह जालन्यात

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

SCROLL FOR NEXT