Breaking : जालन्यात पुराच्या पाण्यात वाहून गेली बस! पहा VIDEO लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Breaking : जालन्यात पुराच्या पाण्यात वाहून गेली बस! पहा VIDEO

जालन्याच्या परतूर तालुक्यातील श्रीष्ठी गावातून वाहणाऱ्या कसुरी नदीवरील नलकांडी पुलावरून राज्य परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना धक्कादायक घडली आहे. या बसमध्ये चालक आणि वाहकासह २३ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्याच्या परतूर तालुक्यातील श्रीष्ठी गावातून वाहणाऱ्या कसुरी नदीवरील नलकांडी पुलावरून राज्य परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना धक्कादायक घडली आहे. या बसमध्ये चालक आणि वाहकासह २३ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत माहिती समजताच स्थानिकांनी नदी पात्रात उड्या मारून प्रवाशांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. या घटनेत पाण्यात वाहून जात असणाऱ्या दोन लहान मुलांना देखील वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी परतूर आणि आष्टी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून, वाहकाकडील तिकीट मशीन चालू करण्याचा प्रयत्न सुरु असून, बसमध्ये आणखी काही प्रवाशी होते का याचा शोध ग्रामस्थ आणि पोलिसांकडून केला जात आहे.

घटनास्थळी जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर च्या साहाय्याने वाहून गेलेल्या बस ला बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासन, आणि महसूल प्रशासनातील अधिकारी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरूच आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amboli Recipe: कोकणातली स्पेशल मऊ, लुसलुशीत अन् जाळीदार आंबोळी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Yoga Poses For Hunchback: पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी करा ही 5 योगासने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

Ajit Pawar Death: पुरावे असताना कारवाई का नाही? मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

SCROLL FOR NEXT