परीक्षा महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले उत्तरप्रदेशात! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि 'ड' या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असून यासाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहेत.
परीक्षा महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले उत्तरप्रदेशात! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ
परीक्षा महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले उत्तरप्रदेशात! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळसाम टीव्ही

पुणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि 'ड' या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असून यासाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहेत. या परीक्षेला राज्यभरातून 8 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. गट 'क' साठी २७४० तर, गट 'ड' साठी ३ हजार ५०० जागा, एकूण ६ हजार २०० जागा भरण्यात येत आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी निराश :

परीक्षा 2 दिवसांवर आली असतानाही अद्यापही कित्येक उमेदवारांना हॉल तिकीटच मिळाले नाहीत. तर दुसरीकडे महाप्रयासाने हॉल तिकीट डाऊनलोड करूनही विद्यार्थ्यांच्या समस्या सुटत नाहीयेत. विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिल्यानुसार त्यांना परीक्षा केंद्रे मिळाली नसून कोणत्याही ठिकाणचे केंद्र त्यांना मिळाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना जवळ पडेल अश्या ठिकाणचा परीक्षा केंद्र प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांनी दिला असतानाच, त्यांना भलतीकडेच परीक्षा केंद्र मिळाली आहेत.

उदा : आरोग्य विभागाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये आहे. ज्यांनी दोन्ही शिफ्टसाठी फॉर्म भरलेत त्यातील कित्येकांची सकाळची 10 ची परीक्षा एका जिल्ह्यात तर दुपारची 3 ची परीक्षा वेगळ्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे उमेदवार परीक्षा देणार कसा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील पहा :

गैरसोयीची परीक्षा केंद्रे - इतकी की थेट दुसऱ्या राज्यात देखील

वरचे उदाहरण एकवेळ ठीक, पण यावर कहर म्हणजे एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र महाराष्ट्रात तर सोडाच, थेट उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका विद्यालयात आले आहे. आता त्या विद्यार्थ्यांने करायचे काय? अनेक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे प्रचंड गैरसोयीची परीक्षा केंद्रे मिळाल्याची तक्रार केली आहे. परीक्षा राहिली बाजूला आणि वेगळाच मनस्ताप ऐन परीक्षेच्या आधी होत असल्याची तक्रार उमेदवार करत आहेत.

हेल्पलाईनची केवळ औपचारिकता ?

दोन तीन दिवसांपासून मोठया प्रमाणात तांञिक अडचणी येत आहेत. आता तांत्रिक अडचणींसाठी या विभागाने पाच हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत पण ती फक्त औपचारिकता वाटते कारण या क्रमांकावर फोन लावल्यास त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत.

समस्यांची पुनरावृत्ती, सुधारणा नाहीच...

असा अंदाधुंदी कारभार या विभागाचा पहिल्यादाच झालाय असेही नाही. मागच्या वेळीदेखील असेच दिवे या विभागाने लावले होते. परीक्षा झाल्यानंतरही परीक्षेतील कॉपी, निकालांची आणि पात्र उमेदवार यादीतील अनियमितता आणि संदिग्धता, सर्व प्रक्रियेतील प्रचंड अपारदर्शकता इत्यादी समस्या कायमच्या आहेत.

परीक्षा महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले उत्तरप्रदेशात! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ
Facebook वरील ओळखीतून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तरुणीची फसवणूक!
परीक्षा महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले उत्तरप्रदेशात! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ
Breaking : महाड पूर दुर्घटनेचा होणार अभ्यास; समिती गठीत!

विद्यार्थी प्रचंड तणावाखाली :

आरोग्य विभागाच्या अश्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा तितकासा भरोसा या परीक्षा प्रक्रियेवर राहिलेला नाही. अशातच ऐन परीक्षेच्या तोंडावर होणाऱ्या तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थी प्रचंड ताणतणावात आहेत. या संपूर्ण गोंधळाच्या स्थितीवर प्रतिक्रिया देताना स्टुडंट हेल्पिंग हँडस् या विद्यार्थी संघटनेचे कुलदीप आंबेकर यांनी म्हटले आहे कि, सध्याच्या परिस्थितीत कोणती न कोणती शासकीय नोकरी लवकर मिळावी म्हणून या परीक्षा देण्यासाठी सगळेच तरुण अक्षरशः तुटुन पडलेत, जिवाचं रान करत आहेत. करोनाच्या परिस्थितीत काही विद्यार्थी अजूनही बाहेर पडू शकले नाहीत. सध्या ते गावाकडेच आहेत, पण तिथुनही ते अभ्यास करतात, प्रयत्न करतात. अशा वेळी आरोग्य विभाग वारंवार अश्या तांत्रिक चुका का करत आहे? या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, मानसिक खच्चीकरण होत आहे. या सर्वांवर तातडीने उपाय काढण्याची मागणी गरज आहे.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com