Bus Accident On Mumbai Goa Highway Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : टायर फुटलं, चालकाचं नियंत्रण सुटलं; मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

Private Bus Accident : टायर फुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली.

Chandrakant Jagtap

>> सचिन कदम

Bus Accident On Mumbai Goa Highway : भरधाव वेगात असलेल्या खासगी बसचं टायर फुटून मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. या भीषण अपघातात बसमधील ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) चांडवे गावाच्या हद्दीत हा खासगी लक्झरी बसला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. हा अपघात मध्यरात्री पावणे ३ वाजण्याच्या सुमारास झाला.

रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या या बसमध्ये अपघातादरम्यान 22 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी 7 प्रवाशांना दुखापत झाली असून यातील ४ जण गंभीर जखमी आहे. या चारही प्रवाशांना 4 पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे, तर किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांना महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये प्रथोमोपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Bus Accident)

दरम्यान या अपघात प्रकरणी बस चालकाविरुद्ध भा.द.वी. कलम 279, 337, 338 सह मोटार वाहन कायदा प्रमाणे महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा

Today Gold Rate: १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर

Real Money Gaming: ऑनलाइन गेमिंगवर मोठा बदल! सरकार Real Money Gamesवर बंदी आणण्याच्या तयारीत, नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर

राज ठाकरे-फडणवीसांची अचानक भेट, उद्धव ठाकरेंच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया, दोन शब्दात विषय संपवला

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कर्णधार? BCCI चा नवीन प्लॅन, वर्ल्ड कपआधी होणार घोषणा

SCROLL FOR NEXT