पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vitthal rukmini mandir pandharpur) परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. हे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. यामध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या गाभा-याचा समावेश आहे. दरम्यान काम सुरु असताना विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या मूर्तीला बुलेटफ्रुफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विठ्ठलाच्या गर्भगृहातील जीर्णोध्दाराचे काम सुरू झाले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली चांदीचे आवरण नुकतेच काढण्यात आले. या मंदिरातील गर्भगृह, चौखांबी , सोळखांबी अशा भागातील पुरातन दगडी खांब आणि प्रवेशद्वारावर लावलेली चांदी काढण्याची प्रक्रिया नुकतीच झाली.
दरम्यान आजपासून (ता. 18 मार्च) गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. त्यापूर्वी देवतांच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीला बुलेटफ्रुफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. (Maharashtra News)
वारकऱ्यांनी केली चंद्रभागेची स्वच्छता
वारकरी सेवा संघ आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये 200 वारकरी सहभागी झाले होते. वारक-यांनी स्वच्छता करून जवळपास पाच टन कचरा गोळा केला. हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबवणार असल्याचे सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.