Police investigate a triple tragedy reported from Buldhana's  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Horror: बुलढाण्यात काळरात्र! मुलाने कुऱ्हाडीने आई-बापाची हत्या केली, नंतर गळफास घेतला, २ मुलं थोडक्यात वाचली

Buldhana son murders parents with axe and commits suicide : बुलढाण्यातील सावरगाव डुकरे गावात भीषण घटना घडली. दारूच्या नशेत मुलाने कुऱ्हाडीने आई-वडिलांचा खून करून स्वत: गळफास घेतला. शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी, साम टीव्ही

Buldhana Double Murder Case : मुलाने दारूच्या नशेत जन्मदात्या आई आणि बापाची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. शेतीच्या वादातून मुलाने आई आणि बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. मुलगा अन् मुलगी आजी-आजोबाकडे गेल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरेमध्ये ही हादरवणारी घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिशय शांत आणि साधं असणारे सावरगाव डुकरे हे गाव रात्री एका भीषण घटनेने हादरले. दारूच्या नशेत स्वतःच्याच आई-वडिलांचा कुऱ्हाडीने खून करून त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल डुकरेच्या या कृत्याने गावच काय संपूर्ण जिल्हा हादरला. मृतांमध्ये वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७), आई लता सुभाष डुकरे (५५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) यांचा समावेश आहे.

विशाल याला दारूचे व्यसन असल्याने वारंवार घरात वाद व्हायचे. दरूमुळे एका घराचे अस्तित्वच संपले अशी स्थिती झाली आहे. गावातील लोक सांगतात, विशाल लहानपणी हुशार होता, शाळेत पहिला यायचा. पण हळूहळू तो बिघडत गेला. कामधंदा सोडून दारूच्या नशेत दिवस घालवू लागला. आई-वडिलांना शिवीगाळ, मारहाण हे रोजचं झालं. या व्यसनामुळे त्याचं लग्न मोडलं, मित्र दूर झाले आणि घरातली शांतता कायमची हरवली. चिखली घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला.

आज सकाळी ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा तिन्ही मृतदेह पाहून सगळं गाव अवाक् झालं. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केली. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अमोल गायकवाड आणि सुधीर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतक आरोपी विशालचा मोठा भाऊ शरद पाटील यांचा युवराज नावाचा ११ वर्षाचा मुलगा व आर्या नावाची ६ वर्षाची मुलगी. या दोन्ही चिमुकल्यांना आजी-आजोबांचा मोठा लळा होता. रोज सायंकाळी ते आजी-आजोबांकडे झोपायला जात. सुदैवाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते आजोबा-आजीकडे गेले नव्हते. घटनेच्या वेळी या दोन्ही चिमुकल्यांच्या अनुपस्थितीने त्यांच्यावरील संकट टळले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT