Buldhana Wedding News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: बुलढाण्यात अनोखा विवाह सोहळा, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ; सर्वत्र होतंय कौतुक

Buldhana Latest News: बुलढाण्यामधील एक लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण म्हणजे बुलढाण्यामधील या जोडप्याने थेट संविधानाची शपथ घेऊन लग्नगाठ बांधली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा| ता. २५ डिसेंबर २०२३

Buldhana Wedding News:

लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम. आयुष्यातला हा खास क्षण कायम आठवणीत राहावा, अगदी खास अविस्मरणीय व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे अगदी धुमधडाक्यात, थाटामाटात लग्न सोहळा पार पडावा. अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा लग्न सोहळ्यांची माध्यमांवर चर्चाही पाहायला मिळते. बुलढाण्यामधील एक लग्नसोहळाही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण म्हणजे बुलढाण्यामधील या जोडप्याने थेट संविधानाची शपथ घेऊन लग्नगाठ बांधली आहे.

संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ!

लग्न म्हटलं की (Wedding) डीजे, घोडा, फटाके आलेच. अलिकडच्या काळात तर प्री वेडिंग शूट च फॅड आलय.. ह्या सर्व गोष्टी आपल्या लग्नात व्हाव्या अशी सर्वच वधू वरांची अपेक्षा असते, परंतू यासोबतच आपण भारतीय या नात्याने भारतीय संविधानाचा आदर करत भारतीय संविधानाची शपथ घेऊन बुलढाण्यात (Buldhana) वधू वरांनी प्रास्ताविकेचे वाचन करून आपली रेशीमगाठ बांधली आहे.

शुभांगी आणि सुमित असे या विवाहित जोडप्याचे नाव आहे. पत्रकार सिद्धार्थ आराख यांची कन्या शुभांगी हिचा विवाह सुंदरखेड येथील सुमित अंभोरे यांच्यासोबत संपन्न झाला. यावेळी वधु- वराने भारतीय संविधानाची शपथ घेऊन सात फेरे घेतले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि कुणाल गायकवाड यांच्याहस्ते वधू वरांना भारताच्या संविधानाची प्रत देण्यात आली. आणि आमदार संजय गायकवाड, पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह जन समुदायाच्या उपस्थितीत वधू वरांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यानंतर इतर धार्मिक विधी नुसार हा आगळावेगळा विवाह पार पडला.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case : मला आरोप मान्य नाही, कराड बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: केडीएमसी निवडणुकीत महायुती होणार; शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

Mobile Ban: महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; १५ गावातील ग्रामपंचायतींचा तालिबानी आदेश

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

SCROLL FOR NEXT