Rohit Pawar News: अजित पवारांचे अमोल कोल्हेंना चॅलेंज, रोहित पवारांचा टोला, म्हणाले; 'कारवाईच्या भितीने भाजपसोबत...'

Ajit Pawar Vs Rohit Pawar: 'निवडणूका जवळ आल्याने कोणाला पद यात्रा सुचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे," अशी टीका अजित पवार यांनी केली होती. यावर रोहित पवार यांनीही उत्तर दिले आहे.
Rohit Pawar ON Ajit Pawar
Rohit Pawar ON Ajit PawarSaam tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे|ता. २५ डिसेंबर २०२३

Rohit Pawar News:

निवडणूकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदार संघात पर्याय देणार असल्याचे सांगत थेट आव्हान दिले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवरुनही टीका केली. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

अजित पवारांची टीका..

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) लोकसभा निवडणूकीत पाडणार असल्याचे म्हणत थेट आव्हान दिले "मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे," असा टोलाही त्यांनी लगावला होता. अजित पवारांच्या या टीकेला आता रोहित पवार यांनीही थेट उत्तर दिले आहे.

रोहित पवारांचा पलटवार...

"आम्ही विचारावर राहीलो म्हणुन विरोधात आहोत. नाहीतर आम्हीही सत्तेत असतो. त्यांच्याकडे अर्थशक्ती आहे, सत्ता आहे. त्यामुळे ते तसे बोलु शकतात,' असा टोला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लगावला.

तसेच "त्यांनी पवार साहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्ष सत्ता उपभोगली. आता कारवाईच्या भीतीने ते भाजपबरोबर गेले आहेत. त्यांच्याबरोबर सत्ता, पैसा, यंत्रणा आहे. मात्र आमच्याबरोबर जनता आहे..." अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar ON Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar: बंडावरुन वार- पलटवार! अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर; म्हणाले...

अमोल कोल्हेंचे उत्तर...

अजित पवार यांच्या या आव्हानाला उत्तर देताना 'दादांचे वर्चस्व आहे. ते मोठे नेते आहेत. निवडून आणण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण भागासाठी चेहरा मोहरा बदलण्यासाठी खूप काम केले. जनताही पवारांच्या पाठिशी उभी राहील. कोणाच्या बाजूच्या उभे राहायचे ,मूल्यांच्या तत्वांच्या बाजूने उभे राहायचे आहे. हे जनता ठरवेल.. असा टोलाही त्यांनी लगावला. (Latest Marathi News)

Rohit Pawar ON Ajit Pawar
Shirdi News : साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत अलोट गर्दी; ३१ डिसेंबरला रात्रभर मंदिर राहणार खुले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com