Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Shiv Chhatrapati Sports Award: बुलडाण्याला मिळाली नवी झळाळी; जिल्ह्यातील तिघांनी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारावर नाव कोरलं

Shiv Chhatrapati Krida Puraskar: १० वर्षांनंतर बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षकाला हा पुरस्कार मिळत आहे. या पुरस्कारामुळे तिघांनी जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे.

Vishal Gangurde

संजय जाधव

Buldhana News: बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातीलला खेळाडू व एका प्रशिक्षकाला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्याला एक नवी झळाळी मिळाली आहे. १० वर्षांनंतर बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षकाला हा पुरस्कार मिळत आहे. या पुरस्कारामुळे तिघांनी जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे. (Latest Marathi News)

राज्य शासनाने जाहीर केलेल्या या क्रीडा पुरस्कारामध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे २०१९ पासून प्रशिक्षक असलेले चंद्रकांत इलग यांना २०२१-२२ चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर तिरंदाजीचीच खेळाडू मोनाली जाधवला आणि दिव्यांग खेळाडू अनुराधा सोळंकी हिला व्हीलचेअर तलवारबाजीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चंद्रकांत इलग हे सध्या भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक आहेत. सैन्यातून २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याचवर्षी त्यांनी धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण बुलढाण्यात निःशुल्क सुरु केले. त्यानंतर ते पोलिस दलात सहभागी झाले. त्यांच्या मेहनतीमुळे देशात आज महाराष्ट्र पोलिस दलाचे धनुर्विद्येत नाव झाले आहे, त्यांच्याच मार्गदर्शनात प्रथमेश जावकार जागतिक क्रमवारीत अव्वल आहे.

मोनाली जाधवने चीनमधील आंतरराष्ट्रीय पोलीस गेममध्ये भारताचा डंका वाजवला होता. मिहीर अपारनेही यूथ वर्ल्ड कप गाजवला तर आता मोनाली जाधवनेही आयर्लंडमध्ये जिल्ह्याच्या लौकिकात नुकतीच भर टाकली.

मोनाली जाधव ही पोलीस दलात आहे. २०१९ मध्ये तिने चीनमधील चेंगडू येथे भारतासाठी दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले आहे. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तिने लौकिक मिळविला आहे.

मोनालीने आपल्या कष्टाच्या जोरावर ही किमया साधली आहे. प्रशिक्षक चंद्रकांत ईलग यांच्यासोबतच तिला शिव छत्रपती पुरस्कार खेळाडू म्हणून जाहीर झाला आहे.

तर अनुराधा सोळंकींना दिव्यांग खेळाडू म्हणून व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये शिवछत्रपती क्रीडापुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक पातळीवर सध्या ३८ व्या स्थानावर अनुराधा सोळंकी आहे.

राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने आतापर्यंत सात पदके मिळविली आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागात त्या सध्या कार्यरत आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रात बुलडाण्याचा लौकिक वाढतांना दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT