Buldhana Crime News  SaamTv
महाराष्ट्र

लग्नात सूत्रसंचालन करणं पत्रकाराला पडलं महागात; शिवसेना नेत्यानं केला कुटूंबावर हल्ला

माझं नाव घेतलं नाही म्हणून, शिवसेना नेत्यांची दादागिरी

संजय जाधव

बुलढाणा: मोताळा येथील एका लग्नकार्यात पत्रकार गणेश झवर हे सूत्र संचालन करत होते. तिथे उपस्थित असलेले शिवसेना (Shiv Sena) पदाधिकारी शरद पाटील यांचे नाव घेतले नाही, याचा राग मनात घेऊन रात्रीच्या सुमारास गणेश झवर यांच्या घरी जाऊन जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. यात लोखंडी रॉड, राफ्टर आदी साहित्याचा वापर करण्यात आला.

हे देखील पहा-

या मारहाणीत (beating) झवर कुटुंबातील 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बुलडाणा (Buldhana) येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. बोराखेडी पोलिसांनी (police) यात दोन्ही बाजूच्या 13 जणांवर गुन्हे दाखल केले असून अद्यापपर्यंत एकालाही अटक (Arrested) करण्यात आली नाही. दोन्ही गटातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. या घटनेने मोताळा शहरासह जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुढे आला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या हल्ल्यात सूत्रसंचालनकर्ते पत्रकार गणेश झंवर आणि त्यांच्या पत्नी अनिता झंवर यांच्यासह झंवर परिवारातील धनराज, वैभव, विवेक झंवर हे जखमी झाले आहेत. झंवर कुटुंबाने बोराखेडी पोलिसांमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT