नागपूर : शासकीय कामासाठी कार्यालयात कामासाठी विना हेल्मेट (Without Helmet) येणाऱ्यांवरती आजपासून कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकवेळा झालेल्या अपघातात विना हेल्मेट असल्यामुळे मोटार सायकल चालकाचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकारकडून हेल्मेट सक्ती कडक करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये (Nagpur) विना हेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई करणार असल्याचे संकेत आरटीओ विभागाकडून (Nagpur RTO Office) देण्यात आले. (Helmet compulsory in Nagpur News Updates)
हे देखील पहा-
नागपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. नागपूर आरटीओ (RTO) सरकारी कार्यालयात तपासणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. नागपूरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीची सुरुवात सरकारी कार्यालयातून होणार आहे. ही कारवाई राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार होणार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात दररोज कितीतरी अपघात होत असतात. मोटार सायकलमध्ये चालकाचा अनेकदा मृत्यू झाल्याचं बघायला मिळतं.
परंतु त्याचा मृत्यू हा हेल्मेट नसल्यामुळे झाल्याचा अनेकदा निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य सरकारच्या परिवहन आयुक्तांनी हेल्मट सक्तीचं पत्र काढले आहे. त्यांची अंमलबजावणी आजपासून नागपूरमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्यांदा सरकारी कार्यालयाता कामासाठी विना हेल्मेट येणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सरकारी कर्मचारी विना हेल्मेट कार्यालयात आल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नागपूर आरटीओ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक अंमलबजावणी मोहीम करावी असे सांगण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेट वापरासंबंधी नागरिकांना प्रबोधन करावे. विना हेल्मेट अधिकारी कर्मचारी किंवा नागरिक निर्दशनास आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी असा पत्रात उल्लेख करण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.