Clash Over Chikhli and Buldhana Mayor Seats Saam
महाराष्ट्र

निवडणुकांपूर्वी महायुतीत 'तू-तू मैं-मैं'; जागा वाटपावरून शिंदेसेना विरोधात भाजप मैदानात; नक्की कारण काय?

Clash Over Chikhli and Buldhana Mayor Seats: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिला बॉम्ब आमदार संजय गायकवाड यांनी फोडला आहे.

Bhagyashree Kamble

  • महायूतीत आता नवा ट्विस्ट.

  • शिंदेसेनेला हवाय चिखलीचे नगराध्यक्षपद.

  • आमदार संजय गायकवाड यांचा इशारा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. यासाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. पक्षाचं बळ वाढवण्यासाठी काही भागात फोडाफोडीचं राजकारण सुरूये. तसेच महायुती आणि महाआघाडीमध्ये जागावाटपावरून बड्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जागावाटपावरून महायुतीत शिंदेसेना आणि भाजप पक्षात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे.

महायुतीत पहिला बॉम्ब फोडत आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. 'युती करायची असेल तर, संपूर्ण जिल्ह्यात सन्मानजनक पद्धतीने करा. काही ठिकाणी युती, काही ठिकाणी नाही. असं चालणार नाही', असं आमदार संजय गायकवाड म्हणाले. यावेळी गायकवाड यांनी थेट मागणी केली आहे. 'चिखलीचे नगराध्यक्ष पद शिंदेसेनेला द्या. त्याबदल्यात मी तुम्हाला बुलढाण्याची जागा सोडतो' असंही गायकवाड म्हणाले. त्यांनी केलेल्या या विधानामुळे जिल्ह्यातील महायुतीत मोठा राजकीय धुरळा उडाला आहे.

या वक्तव्यावर भाजपकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितले की, 'सिटिंग जागा ज्याची असेल त्याला ती जागा मिळते, असा नियम आहे . चिखलीची जागा मागण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण तिथे भाजपचा नगराध्यक्ष मागील निवडणुकीत निवडून आलेला आहे. त्यामुळे ती जागा भाजपची राहणार', असं विजयराज म्हणाले.

'बुलढाण्यातील जागेचा प्रश्न असेल तर, मागच्या २५ वर्षांपूर्वी ना भाजपचा नगराध्यक्ष होता, ना शिंदे गटाचा. त्यामुळे ही जागा मागायचा प्रश्नच नाही. शिवाय जर बुलढाण्यातील नगराध्यक्षाची जागा भाजपला सुटणार असेल. भाजपाला देण्यात आली, तर आम्ही युतीत लढण्यास तयार आहोत', असंही विजयराज शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT